नवी दिल्ली, 26 जानेवारी: आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर देत आहे. याअंतर्गत बँकेकडून ग्राहकांना 48 दिवसांसाठी इंटरेस्ट फ्री कॅश अडव्हान्स (Cash in Advance) ही सुविधा मिळते आहे. कंपनीने अलीकडेच त्यांचे नवीन 4 क्रेडिट कार्ड लाँच केले होते. ग्राहकांच्या विभिन्न वर्गांना डोळ्यासमोर ठेवून कंपनीने हे क्रेडिट कार्ड लाँच केले होते. या क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या काही सुविधा मात्र साऱख्याच आहेत. या क्रेडिट कार्ड्स (Credit Cards) वरील व्याजदर 9% ते 36% या दरम्यान आहे. दरम्यान Cash in Advance चा फायदा घेणारे ग्राहक वेळेत ही रक्कम जमा करत असतील त्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. बँकेच्या या सुविधेमुळे ग्राहकांना क्रेडिट कार्डवर ‘इंटरेस्ट फ्री कॅश’ सुविधा मिळेल. शिवाय ही बँक ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यावर वार्षिक 7 टक्के दराने व्याज देते आहे. (हे वाचा- नवऱ्याच्या स्वप्नात आला लॉटरीचा नंबर, या महिलेने जिंकला 340 कोटींचा जॅकपॉट ) आयुष्यभरासाठी क्रेडिट कार्ड फ्री याशिवाय IDFC First Bank चे क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी आयुष्यभरासाठी फ्री असतील. अर्थात दरवर्षी याकरता मेंबरशीप फी द्यावी लागणार नाही. जर ग्राहकांनी या क्रेडिट कार्ड्सच्या माध्यमातून 20,000 रुपयांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन केलं तर त्यांना मार्केटमध्ये इतर कोणत्याही बँकेद्वारे देण्यात येणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्सपेक्षा अधिक रिवॉर्ड पॉइंट्स देणार असल्याचा दावा केला जात आहे. 4 क्रेडिट कार्ड लाँच IDFC फर्स्ट बँकेने ग्राहकांसाठी 4 प्रकारचे क्रेडिट कार्ड लाँच केले आहेत. FIRST मिलेनिया क्रेडिट कार्ड, FIRST क्लासिक क्रेडिट कार्ड, FIRST सिलेक्ट क्रेडिट कार्ड आणि FIRST वेल्थ क्रेडिट कार्ड. बँकेने दिलेल्या माहितीनुसार हे क्रेडिट कार्ड केवळ सध्याच्या ग्राहकांसाठी लाँच करण्यात आले आहेत. बँकेने अशी माहिती दिली आहे की, एप्रिलमध्ये या सेवेचा विस्तार करत बँकेकडून ही सेवा सर्व ग्राहकांसाठी लाँच केली जाईल. FIRST मिलेनिया क्रेडिट कार्ड FIRST मिलेनिया क्रेडिट कार्ड घेणाऱ्या कस्टमर्सना 90 दिवसात 15,000 रुपये खर्च केल्यानंतर 500 रुपयांचं वेलकम गिफ्ट वाउचर मिळेल. याशिवाय महिन्यातून एकदा मुव्ही तिकिटांवर 100 रुपयांपर्यंत 25% डिस्काउंट मिळेल. (हे वाचा- बेळगाव ते नाशिक एका तासात होणार प्रवास, पहिल्यावहिल्या विमानाने घेतलं उड्डाण ) FIRST क्लासिक क्रेडिट कार्ड FIRST क्लासिक क्रेडिट कार्ड घेणाऱ्या ग्राहकांना देखील मिलेनिया कार्ड घेणाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळतील. FIRST सिलेक्ट क्रेडिट कार्ड FIRST Select कार्ड घेणाऱ्या ग्राहकांना महिन्यातून दोनवेळा 250 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट मिळेल. याशिवाय त्यांना प्रत्येक तिमाहीमध्ये डोमेस्टिक एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनवर 4 कॉम्प्लीमेंटरी लाउंज मिळेल. FIRST वेल्थ क्रेडिट कार्ड FIRST वेल्थ क्रेडिट कार्ड होल्डर्सना वरील सर्व सुविधांसह इंटरनॅशनल एअरपोर्टवर देखील 4 कॉम्प्लीमेंटरी लाउंज मिळेल आणि दर महिन्याला स्पा व्हिजिट करण्याची सुविधा मिळेल. या कार्ड्सवर ग्राहकांना इन्शूरन्स कव्हर देखील मिळेल.