JOIN US
मराठी बातम्या / मनी / बँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना

बँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना

जर तुमचे सॅलरी अकाऊंट आयसीआयसीआय बँकेमध्ये (ICICI Bank) आहे तर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी (Overdraft Facility) मिळू शकेल. बँक ग्राहकांना त्यांच्या त्यांच्या पगाराच्या तिप्पट रक्कम पैसे काढण्याची मुभा या योजनेअंतर्गत देते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : जर तुमचे सॅलरी अकाऊंट आयसीआयसीआय बँकेमध्ये आहे तर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी (Overdraft Facility) मिळू शकेल. बँक ग्राहकांना त्यांच्या त्यांच्या पगाराच्या तिप्पट रक्कम पैसे काढण्याची मुभा या योजनेअंतर्गत देते. तुमचा ईएमआयचा चेक बाऊन्स होऊ नये याकरता आयसीआयसीआय बँक ही सुविधा देत आहे. याकरता बँक शॉर्ट टर्म इंस्टंट क्रेडिट उपलब्ध करून देईल. ऑनलाइन अर्ज करून या सुविधेचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. जाणून घ्या या योजनेसाठी तुम्ही कसे अर्ज कराल आणि ही योजना कशी महत्त्वाची आहे. ओव्हरड्राफ्ट फॅसिलीटी म्हणजे काय? विविध सरकारी आणि खाजगी बँका ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देतात. अधिकतर बँका चालू खाते, सॅलरी खाते आणि फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposite FD) वर ही सुविधा देतात. काही बँका शेअर, बाँड आणि विमा पॉलिसीवर देखील ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध करून देतात. या योजनेअंतर्गत तुम्ही बँकेकडून तुमच्या गरजेच्या वेळी पैसे घेऊ शकता आणि नंतर ते परत करू शकता. (हे वाचा- Gold-Silver Update : मार्चनंतर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक प्रमाणात उतरले सोन्याचे दर) कसा घ्याल या योजनेचा लाभ? -तुमच्या इंटरनेट बँकिंग अकाऊंटमध्ये लॉग इन करा -त्यानंतर ‘Offers’ सेक्शनमध्ये जा -त्यानंतर प्री-अप्रुव्ह्ड ओडी ऑफर तपासा आणि त्यानंतर त्याठिकाणी अप्लाय करा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचे महत्त्वाचे फीचर्स -ग्राहकांना कोणतेही कागदपत्र दिल्याशिवाय ओव्हरड्राफ्ट  फॅसिलिटीसाठी मंजुरी मिळते. -ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीमध्ये तुम्हाला तुमच्या पगाराच्या तीन पट क्रेडिट लिमिट आहे -फ्लेक्जीकॅशमध्ये एका निश्चित दरामध्ये व्याज मोजले जाते (हे वाचा- कन्या दिवसानिमित्त तुमच्या मुलीसाठी खास योजना,21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख ) -ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार थकबाकीची रक्कम देता येते -वापरण्यात आलेली ओव्हरड्राफ्ट रक्कम बँकेकडे चुकवताना कोणताही फ्लोअर चार्ज द्यावा लागत नाही काय आहे शुल्क? प्रोसेसिंग फी- 1900 रुपयापासून सुरुवात + जीएसटी रिन्यूअल फी- फ्लॅट 1900 रुपये + जीएसटी आरओआय- वार्षिक 12 ते 14 टक्के

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या