नवी दिल्ली, 02 जून: सध्याचा काळात आधार कार्ड (Aadhar card) हे एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. सर्व सरकारी ते खाजगी संस्थामध्ये विविध कारणांसाठी आधार कार्डची आवश्यकता भासते. मात्र देशात बहुतांश लोक असे आहेत की ज्यांना त्यांचा आधार कार्डवरील फोटो अजिबात आवडत नाही. अनेकदा सोशल मीडियावर याबाबत मीम देखील शेअर केले जातात, आधार कार्डवरील फोटोंची खिल्ली उडवली जाते. तुम्हाला देखील तुमचा आधार कार्डावरील फोटो आवडत नसेल आणि तो बदलण्याची तुमची इच्छा असेल तर ते शक्य आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे काम पूर्ण करू शकता. UIDAI देतं फोटो अपडे करण्याची परवानगी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार कार्ड धारकांना त्यांचा आधार कार्डावरील फोटो अपडेट करण्याची परवानगी देतं. याठिकाणी आम्ही तुम्हाला आधार कार्डावर चांगला फोटो लावण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. तुम्ही जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. हे वाचा- PF खात्यातून पैसे काढण्यासाठी EPFO ने दिली विशेष सूट, केवळ 3 दिवसात मिळेल रक्कम काय आहे आधार कार्डावरील फोटो बदलण्याची पद्धत -सर्वात आधी तुम्हाला UIDAI ची वेबसाइट uidai.gov.in यावर लॉग इन करावं लागेल आणि आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा लागेल -हा फॉर्म भरून तुम्ही जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा -त्याठिकामी आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स घेतील -त्यानंतर त्यांच्याकडून फोटो देखील घेतला जाईल हे वाचा- मुलीच्या लग्न-शिक्षणासाठी पैशांचं नो टेन्शन! PNB मधली ही योजना देईल चांगला नफा -त्यानंतर आधार केंद्रावरील कर्मचारी शुल्क स्वरुपात 25+जीएसटीची रक्कम घेऊन तुमचा फोटो आधार कार्डावर अपडेट करेल. -याठिकाणी कर्मचाऱ्याकडून तुम्हाला यूआरएन (URN) सह एक स्लिप देखील मिळेल -तुम्ही या URN चा वापर करून तुमचा फोटो बदलला आहे की नाही तपासता येईल -आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर नवीन फोटोसह तुम्ही अपडेटेड आधार कार्ड UIDAI च्या वेबसाइटच्या माध्यमातून डाउनलोड करू शकता.