JOIN US
मराठी बातम्या / मनी / SBI, PNB सह या 6 बँकांमध्ये आहे जनधन अकाउंट, तर असा चेक करा बॅलन्स

SBI, PNB सह या 6 बँकांमध्ये आहे जनधन अकाउंट, तर असा चेक करा बॅलन्स

तुमच्या अकाउंटमधील बॅलन्स तपासण्यासाठी सरकारने काही टोल फ्री क्रमांक जाहीर केले आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जुलै– सरकारने जनतेला सरकारी योजनांचा (PMJDY) लाभ थेट मिळावा यासाठी जनधन अकाउंट (Jan Dhan Account) सुरू करण्याची सोय उपलब्ध करून दिली. एसबीआय (SBI), पीएनबी (PNB) या बँकांसह इतर बँकांतही जनधन अकाउंटची सोय आहे. यासाठी तुम्हाला वारंवार बँक अकाउंट चेक करणं गरजेचं आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत सतत बँकेत जाणे सोयीचे ठरत नाही. तुमच्या अकाउंटमधील बॅलन्स तपासण्यासाठी सरकारने काही टोल फ्री क्रमांक जाहीर केले आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ इंडिया (Bank of India), एचडीएफसी बँक (HDFC) आणि आयसीआयसीआय (ICICI) या बँकांसह इतर काही बँकांचे टोल फ्री नंबर्स आपण जाणून घेऊया. १. एसबीआय (SBI Bank) – आपले एसबीआय बँकेत जनधन खाते असेल तर तुम्हाला सर्वप्रथम 18004253800 और 1800112211 या दोन कस्टमर केअर (Customer care) नंबरवर कॉल करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सोयीची भाषा निवडावी लागेल. पुढे ‘1’ नंबर दाबून तुमच्या शेवटच्या पाच व्यवहारांची आणि बॅलन्सची माहिती तुम्ही घेऊ शकता. तसेच तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून (Registered Mobile Number) 92237 66666 या नंबरवरदेखील संपर्क साधू शकता. (हे वाचा: वाढत्या वीज बिलांमुळे हैराण असाल तर वापरा या ट्रिक, 50 टक्क्यांपर्यंत होईल बचत!   ) २. पीएनबी बँक (PNB Bank) – या बँकेत तुमचे जनधन अकाउंट असेल तर तुम्हाला 18001802223 या 01202303090 या नंबरवर मिसकॉल(Miss call) देऊन किंवा एसएमसएस (SMS) पाठवून तुमच्या अकाउंटचा बॅलन्स जाणून घ्यावा लागेल. परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरची आवश्यकता आहे. जर तुमचा मोबाइल नंबर बँकेत रजिस्टर्ड नसेल तर या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तो नंबर रजिस्टर्ड करून घ्यावा लागेल. ३. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) – या बँकेत जनधन अकाउंट असलेले ग्राहक बॅलन्स चेक करण्यासाठी 9594612612 या नंबरवर मिसकॉल देऊ शकतात किंवा 9215676766 या नंबरवर ‘IBAL’ असा एसएमएस पाठवू शकता. (हे वाचा: आता घरबसल्या कर्ज घ्या, तेही बिनव्याजी; Paytm ची धमाकेदार योजना   ) ४. एचडीएफसी बँक (HDFC Bank) – या बँकेतील जनधन खातेधारक विविध सेवांसाठी पुढील टोल फ्री नंबर्सचा वापर करू शकतात. बॅलन्स चेक 18002703333, मिनी स्टेटमेंटसाठी - 18002703355, चेक बुक मागवण्यासाठी – 18002703366 आणि अकाउंट स्टेटमेंट जाणून घेण्यासाठी - 1800 270 3377 . ५. बँक ऑफ इंडिया (Bank of India) – या बँकेत जनधन खातं असणारे ग्राहक 09015135135 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपला अकाउंट बॅलन्स चेक करू शकतात. ६. ॲक्सिस बँक(Axis Bank) – या बँकेतील ग्राहक अकाउंट बॅलन्स जाणून घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 18004195959 वर कॉल करू शकतात आणि मिनी स्टेटमेंटसाठी 18004196969 वर कॉल करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या