Home /News /technology /

वाढत्या वीज बिलांमुळे हैराण असाल तर वापरा या ट्रिक, 50 टक्क्यांपर्यंत होईल बचत!

वाढत्या वीज बिलांमुळे हैराण असाल तर वापरा या ट्रिक, 50 टक्क्यांपर्यंत होईल बचत!

कोरोना काळात अर्थचक्र बिघडल्यामुळे सर्वच सेवा-सुविधांचे दर वाढले आहेत, महागाई वाढली आहे. वीजदरही ठरावीक दिवसांनी वाढत आहेत, त्यामुळे भरमसाट वीजबिलं (Electricity Bill) येण्याचे प्रकार घडत आहेत. या सगळ्यामुळे साहजिकच नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 13 जुलै : कोरोना काळात अर्थचक्र बिघडल्यामुळे सर्वच सेवा-सुविधांचे दर वाढले आहेत, महागाई वाढली आहे. वीजदरही ठरावीक दिवसांनी वाढत आहेत, त्यामुळे भरमसाट वीजबिलं (Electricity Bill) येण्याचे प्रकार घडत आहेत. या सगळ्यामुळे साहजिकच नागरिकांच्या खिशाला कात्री बसत असून, त्यांचं मासिक अर्थचक्रही बिघडलं आहे. काही खर्च आपण प्रयत्नपूर्वक कमी करू शकतो. त्यात वीजबिलाचाही (Electricity Bill) समावेश आहे. सध्याचा काळ असा आहे, की विजेच्या उपकरणांचा (Electric Appliances) वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, इंडक्शन शेगडी, डिशवॉशर, व्हॅक्युम क्लीनर, ओव्हन, कूलर अशा किती तरी उपकरणांची यादी करता येईल. पंखे, बल्ब, ट्यूबलाइट्स वगैरे नेहमीची उपकरणं तर असतातच. दिवसेंदिवस अशा उपकरणांची संख्या वाढत जाणार असून, त्यांचा वापरही वाढत जाणार आहे; मात्र आपण वापर कशा प्रकारे करतो, यावर बिल किती येणार हे अवलंबून असतं. बिल कमी येण्यासाठीच्या काही टिप्स आपण पाहू या. बल्ब आणि ट्यूबलाइट्स (Bulb, Tubelights) या घरातल्या प्रकाशासाठी अत्यावश्यक गोष्टी आहेत. बल्ब नेहमी एलईडी (LED) प्रकारचे वापरावेत. तसंच ट्यूबलाइट्सच्या ऐवजी सीएफएल बल्ब्स (CFL) वापरावेत. किंवा सीएफएल/एलईडी प्रकारच्या ट्यूबलाइट्सही मिळतात. त्यांच्या वापरामुळे प्रकाश तर दर्जेदार मिळतोच. शिवाय मुख्य म्हणजे वीज कमी खर्च होत असल्याने बिल कमी येतं. फ्रीज, एसी किंवा अन्य उपकरणांना त्यांच्या वीजवापरानुसार एक ते पाच स्टार रेटिंग दिलेलं असतं. पाच स्टार रेटिंग (5 Star Rating) असलेल्या उपकरणांसाठी कमी वीज खर्च होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यामुळे बिलही कमीच येतं. त्यामुळे अशी उपकरणं खरेदी करताना त्यांचं स्टार रेटिंग पाहूनच खरेदी करावीत. मायक्रोवेव्ह ओव्हनसारखी (Microwave Oven) उपकरणं फ्रीजवर ठेवू नयेत. कारण त्यामुळे वीज जास्त प्रमाणात खर्च होते. फ्रीज कधीच थेट सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी ठेवू नये. फ्रीजच्या आजूबाजूची हवा खेळती असली पाहिजे. तसंच, गरम असलेले खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नयेत. ते सामान्य तापमानाला आल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवावेत. कारण गरम पदार्थ थंड करण्याची फ्रीजची मोठी ऊर्जा खर्च होते, त्यामुळे बिल जास्त येतं. कुठेही दिवे, पंखे विनाकारण सुरू राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यासाठी इन्फ्रारेड सेन्सर, डिमर, मोशन सेन्सर आदींचा वापरही उपयुक्त ठरू शकतो. म्हणजे आवश्यकते इतकाच वापर होऊ शकेल. कम्प्युटर, टीव्ही आदींच्या स्क्रीनसाठी जास्त वीज खर्च होते, त्यामुळे वापरानंतर स्क्रीन्स बंद करण्याची काळजी घ्यावी. मॉनिटर स्पीड मोडमध्ये ठेवावा. तसंच, फोन आणि कॅमेरा चार्ज केल्यानंतर चार्जर प्लगमधून आठवणीने काढून ठेवावा. तो प्लगमध्येच असेल, तर वीज जास्त खर्च होते. उन्हाळाच्या हंगामात एसीऐवजी सीलिंग फॅन (Sealing Fan) किंवा टेबल फॅन वापरायला प्राधान्य द्यावं. पंख्यांसाठी प्रति तास 30 पैसे एवढा खर्च येतो, तर एसीसाठी प्रति तास 10 रुपये खर्च होतो. एसी वापरायचा असेल, तर त्याचं तापमान 25 अंश सेल्सिअस ठेवावं. तसंच, एसी असलेल्या खोलीचं दार बंद राहील, याचीही काळजी घ्यावी. म्हणजे वीजबिल कमी येईल. वीजबिल कमी करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे सौर ऊर्जा, पण हा उपाय थोडा खर्चिक आहे. सौर ऊर्जा प्रकल्प बसवायचा झाला, तर सुरुवातीला गुंतवणूक जास्त करावी लागते; मात्र नंतर वीजबिल कमी येतं. जास्त प्रमाणात वीजनिर्मिती झाली, तर अतिरिक्त वीज ग्रिडला विकणंही शक्य होतं. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी (Solar Power Project) सरकारी अनुदान मिळतं, तसंच कमी व्याजदराने कर्जही उपलब्ध होतं.
First published:

Tags: Electricity bill

पुढील बातम्या