JOIN US
मराठी बातम्या / मनी / Work From Home चा कंटाळा आलाय? तुमच्यासाठी आता निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्याची संधी

Work From Home चा कंटाळा आलाय? तुमच्यासाठी आता निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्याची संधी

IRCTC ने Work From Home च्या पार्श्वभूमीवर Work From Hotel पॅकेजची सुरुवात केली आहे. ज्याअंतर्गत आवडत्या हॉटेलच्या रुममध्ये बसून, ऑफिसचं काम करता येईल.

जाहिरात

तरुण आणि ऑफिस वर्क करणाऱ्या लोकांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून आलं. अशा लोकांमध्ये इतर दिवसांपेक्षा सोमवारी हार्ट अटॅकची भिती 20 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं. वर्षभरात डिसेंबर महिना हा हार्ट अटॅक येण्याचा महिना मानला गेलेला आहे. शनिवारी आणि रविवारी काम नसतं त्यामुळे स्ट्रेस कमी असतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 मे : जर तुम्ही घरबसल्या ऑफिसचं (Work From Home) काम करुन कंटाळला असाल आणि काही चेंज हवा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय रेल्वेच्या ऑनलाईन टिकटिंग आणि कॅटरिंग सेवा देणाऱ्या IRCTC ने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. IRCTC चं ‘Work From Hotel’ - IRCTC ने Work From Home च्या पार्श्वभूमीवर Work From Hotel पॅकेजची सुरुवात केली आहे. ज्याअंतर्गत आवडत्या हॉटेलच्या रुममध्ये बसून, ऑफिसचं काम करता येईल. सध्या IRCTC चं हे पॅकेज केरळच्या हॉटेल्समध्ये दिलं जात आहे. केरळमध्ये निसर्गाच्या सानिध्यात बसून ऑफिसचं काम करता येईल. यासाठी काही रक्कम भरावी लागेल. पॅकेजचं बुकिंग IRCTC वेबसाईट किंवा IRCTC टूरिज्म मोबाईल अ‍ॅपवरुन करता येऊ शकतं. या ऑफरमध्ये पॅकेजची सुरुवात 10,126 रुपयांपासून सुरू होते. यात पाच रात्रीसाठी एका रुममध्ये तीन लोक राहण्याची सुविधा आहे. या पॅकेजमध्ये डिसइन्फेक्टेड रुम, तीन वेळेचं जेवण, दोन वेळा चहा किंवा कॉफी, वाय-फाय, सुरक्षित कार पार्किंग आणि ट्रॅव्हल इन्शोरन्स सामिल आहे. या पॅकेजशिवाय इतर कोणतेही पैसे यात भरावे लागणार नाही. (वाचा -  मंदीत संधी, Tech Sector मध्ये 4000 लोकांना नोकरी देणार ही कंपनी ) IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या हॉटेल्समध्ये मुन्नार, थेक्कडी, कुमारकोम, अलेप्पी, कोवलम, वायनाड आणि कोचीन शहरांतील हॉटेल्स उपलब्ध आहेत. या ऑफरअतंर्गत कमीत-कमी पाच दिवसांचं पॅकेज घ्यावं लागेल. पाच दिवसांपुढेही ते वाढवलं जाऊ शकतं. या ऑफरअतंर्गत कोविड सेफ्टी प्रोटोकॉल आणि स्वच्छतेची मानकं उच्च ठेवण्यात आल्याचा दावा IRCTC ने केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या