JOIN US
मराठी बातम्या / मनी / 'व्हॅलेंटाइन डे'साठी IRCTC ची जबरदस्त ऑफर! कमी पैशात करा बँकॉक दौरा

'व्हॅलेंटाइन डे'साठी IRCTC ची जबरदस्त ऑफर! कमी पैशात करा बँकॉक दौरा

तुम्हाला फेब्रुवारीमध्ये बँकॉक आणि पटाया फिरायला जायचे असेल तर IRCTC तुमच्यासाठी खास टूर पॅकेज घेऊन आले आहे. कमी किंमतीत तुम्हाला परदेशात फिरायची संधी मिळणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जानेवारी: व्हॅलेंटाइन डे जवळ आला आहे. या काळात कपल्स स्पेशल प्लान करत असतात. संपूर्ण व्हॅलेंटाइन विक हा खास असायला हवा असा अनेक जोडप्यांचा हट्ट असतो. काही लोकांना आपल्या जोडीदाराला सरप्राइज देखील द्यायचे असते. तुमचा देखील असाच काही प्लान असेल तर IRCTC चे टूर पॅकेज तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही व्हॅलेंटाईन डेला परदेशा फिरायला जायचा विचार करत असाल तर कमी पैशांमध्ये तुम्हाला हा टूर मॅनेज करता येणार आहे. IRCTC चे खास पॅकेज सध्या उपलब्ध आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्ही बँकॉक आणि पटायाला भेट देऊ शकता. इंडियन रेल्वे टूरिज्म कॉरर्पोशनने या पॅकेजची सुरुवात 11 फेब्रुवारी 2023 पासून केली आहे. जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डेसाठी प्लान करायचा असेल तर तुम्ही आत्ताच याची बुकिंग करू शकता.

किती दिवसांचा असेल प्लान?

IRCTC ने ऑफर केलेले हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचे असेल. या पॅकेज अंतर्गत तुम्ही बँकॉक, पटाया आणि थायलंडला जाऊ शकता. या पॅकेजमध्ये तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत जाऊ शकता. बँकॉकच्या मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. तसेच तुम्ही समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ शकता.

स्वस्तात विमान प्रवासाची सुवर्ण संधी! Air India ची खास ऑफर सुरु, एकच दिवस शिल्लक

कोलकाता येथून हा प्रवास सुरू होईल

या पॅकेज अंतर्गत IRCTC तुम्हाला कोलकाता ते थायलंड फ्लाइट तिकीट बुक करेल. येथून तुम्हाला विविध ठिकाणी पर्यटनासाठी नेले जाईल. 11 फेब्रुवारीपासून हा प्रवास सुरू होणार आहे. तिकीट इकॉनॉमी क्लासमध्ये बुक केले जातील. या टूर पॅकेजमध्ये राहणे म्हणजेच हॉटेल, जेवण, फ्लाइट आदी सुविधा देण्यात येणार आहेत. मात्र, तुमच्या शॉपिंगचा खर्च हा तुम्हालाच करावा लागेल. हे या पॅकेजमध्ये येणार नाही.

फक्त 3500 रुपयांमध्ये वैष्णो देवीच्या दर्शनाची संधी! IRCTC चे टूर पॅकेज पाहिले का?

संबंधित बातम्या

किती खर्च येईल?

जर तुम्ही या टूर पॅकेज अंतर्गत प्रवास करत असाल तर तुम्हाला एका प्रवाशासाठी 54,364 रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे, दोन लोकांसाठी तिकीट बुक करण्यासाठी प्रति व्यक्ती 48,300 रुपये मोजावे लागतील. आणि तीन लोकांसाठी 48,300 रुपये प्रति व्यक्ती भरावे लागतील. या पॅकेजअंतर्गत तुम्ही IRCTC वेबसाइटवर जाऊन फ्लाइट बुक करू शकता.

मिळतील या सुविधा

IRCTC या टूर पॅकेज अंतर्गत प्रवाशांना ब्रेकफास्ट, हॉटेलमध्ये राहण्यासाठी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, टूरिस्ट प्लेस पाहण्यासाठी वाहन आणि नंतर गाईडची सुविधा दिली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या