JOIN US
मराठी बातम्या / मनी / National Pension Scheme: ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक, वृद्धापकाळात मिळेल पेन्शन अन् टॅक्सही वाचेल

National Pension Scheme: ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक, वृद्धापकाळात मिळेल पेन्शन अन् टॅक्सही वाचेल

National Pension Scheme: राष्ट्रीय पेन्शन योजना ही दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. या योजनेत नोकरी दरम्यान तुम्ही थोडे थोडे पैसे जमा करता. अनेक वर्षांच्या गुंतवणुकीनंतर तुमच्याकडं मोठा निधी तयार होतो. एनपीएस खातेधारकांनाही कर सूट मिळते.

जाहिरात

National Pension Scheme: ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक, वृद्धापकाळात मिळेल पेन्शन अन् टॅक्सही वाचेल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 ऑक्टोबरः खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या लोकांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार एक योजना राबवतं. ‘राष्ट्रीय पेन्शन योजना’ असं या योजनेचं नाव आहे. ही अतिशय उपयुक्त योजना आहे. या योजनेच्या मदतीनं तुम्हाला खाजगी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आर्थिक सुरक्षा मिळेल. तसेच या योजनेत गुंतवणूक केल्यास नोकरीदरम्यान तुमचा कर वाचतो. जर तुम्ही या योजनेत योग्य प्रकारे गुंतवणूक केली तर तुम्ही स्वतःसाठी 50 हजार रुपये पेन्शनची व्यवस्था सहज करू शकता. तुम्ही घरबसल्या नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक सुरू करू शकता.  दीर्घकालीन गुंतवणूक योजना- राष्ट्रीय पेन्शन योजना ही दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. या योजनेत नोकरी दरम्यान तुम्ही थोडे थोडे पैसे जमा करता. अनेक वर्षांच्या गुंतवणुकीनंतर हा निधी मोठ्या निधीच्या रूपात तयार होतो. जो तुम्हाला तुम्हाला निवृत्तीनंतर मिळतो. ही योजना पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंटद्वारे चालवली जाते. याचा अर्थ ही थेट सरकारशी संबंधित योजना आहे. नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मध्ये जमा केलेले पैसे गुंतवणूकदाराला दोन प्रकारे मिळतात. तुम्ही ठेव रकमेचा मर्यादित भाग एकाच वेळी काढू शकता, तर दुसरा भाग पेन्शनसाठी जमा केला जाईल. या रकमेतून अ‍ॅन्युइटी खरेदी केली जाईल. तुम्ही अ‍ॅन्युइटी खरेदी करण्यासाठी जितकी जास्त रक्कम द्याल, तितकी जास्त पेन्शन तुम्हाला निवृत्तीनंतर मिळेल. दोन प्रकारची खाती- राष्ट्रीय पेन्शन योजनेत दोन प्रकारची खाती उघडली जातात. पहिल्या प्रकारचं खातं NPS टियर-1 म्हणून ओळखलं जातं, तर दुसऱ्या प्रकारचं खातं NPS टियर-2 असं म्हणतात. जर एखाद्याला निवृत्तीचे फायदे मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी टियर-1 खाते हा एकमेव पर्याय आहे. टियर-1 खातं मुख्यतः अशा लोकांसाठी आहे ज्यांचे पीएफ जमा झालेले नाहीत आणि त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा हवी आहे. हेही वाचा:  खाद्य तेल आणि सोन्या चांदीच्या दराबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय  तुम्ही 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता- या प्रकारचं खातं म्हणजेच NPS टियर-1 केवळ सेवानिवृत्तीनुसार तयार केलं गेलं आहे. यामध्ये तुम्ही किमान 500 रुपये जमा करून खाते उघडू शकता. निवृत्तीनंतर, तुम्ही एकाच वेळी 60 टक्के रक्कम काढू शकता. उर्वरित 40 टक्के रकमेतून अॅन्युइटी खरेदी केल्या जातील, ज्यातून तुम्हाला दरमहा पेन्शन मिळेल.  कर सवलत-

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या