रेल्वेने बंगळुरू, चंदीगड, हावडा, जयपूर, पाटना, प्रयागराज, सिकंदराबाद, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई यांचे दोन क्लस्टरमध्ये विभाजन केले आहे. भारतीय रेल्वेच्या अंदाजानुसार खासगी कंपन्यांमुळे रेल्वेत 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.
नवी दिल्ली, 17 मे : भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) चालवण्यात येणाऱ्या स्पेशल ट्रेनचे बुकिंग करण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. रेल्वेची सबसिडिअरी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉरपोरेशन (IRCTC)च्या वेबसाइटवर राजधानी एक्सप्रेससारख्या (Rajdhani Express) स्पेशन ट्रेन्ससाठी बुकिंग होत आहे. स्पेशल ट्रेन आणि अन्य ट्रेनचे बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना याबाबत स्पष्ट करावे लागणार आहे की, ते ज्या राज्यामध्ये जात आहेत त्याठिकाणच्या क्वारंटाइन प्रोटोकॉल बद्दल अर्थात क्वारंटाइनसाठी काय खबरदारी घेण्यात येणार आहे किंवा काय नियम आहेत याबाबत माहिती आहे. त्यानंतरत तुम्हाला तिकीट बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्लीवरून बंगळुरूला जाणाऱ्या विशेष राजधानी एक्सप्रेसच्या 140 प्रवाशांना परत आणण्यात आले, कारण त्यांनी 14 दिवसांच्या इन्स्टीट्यूशनल क्वारंटाइनसाठी नकार दिला. त्यामुळे भारतीय रेल्वेने आयसीटीसीच्या वेबसाइटवर हे फीचर जोडण्याचा निर्णय घेतला आहे. (हे वाचा- भारतात नोकरीची संधी वाढणार! 800 कोटींची गुंतवणूक करणार ही कंपनी ) भारतीय रेल्वेने 12 मेपासून 15 स्पेशल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. लॉकडाऊनमुळे अडकेल्या मजूर, विद्यार्थी आणि भाविकांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली होती. कसं कराल हे नवीन काम पूर्ण? स्पेशल ट्रेनचे बुकिंग करताना आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर एक पॉप अप येईल. ज्यामध्ये प्रवाशांना हे कन्फर्म करावे लागेल की तुम्ही ज्या राज्यात जात आहात, त्याठिकाणची हेल्थ अॅडव्हायजरी तुम्ही वाचली आहे आणि ते नियम तुम्हाला मान्य आहेत. याठिकाणी असणाऱ्या ओके बटणावर सर्वात आधी क्लिक करावे लागेल. हा मेसेज हिंदी किंवा इंग्रजीमध्ये येईल. त्याचप्रमाणे आरोग्य सेतू अॅप देखील डाऊनलोड करणं आवश्यक आहे. (हे वाचा- स्वस्त घर खरेदीसाठी मोदी सरकारच्या या योजनेचा घेऊ शकाल फायदा, वाचा सविस्तर ) याआधी रेल्वे मंत्रालयाने तिकिट बुकिंग करताना प्रवाशांची माहिती मागितली आहे. ज्याठिकाणापर्यंत प्रवाशांंना पोहोचायचे आहे त्याची संपूर्ण माहिती @RailMinIndia ला देणे आवश्यक आहे. ट्रेसिंगसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. संपादन - जान्हवी भाटकर