JOIN US
मराठी बातम्या / मनी / Railway Rules : तिकीट नसेल तरी करु शकता रेल्वेने प्रवास; समजून घ्या रेल्वेचा 'हा' खास नियम

Railway Rules : तिकीट नसेल तरी करु शकता रेल्वेने प्रवास; समजून घ्या रेल्वेचा 'हा' खास नियम

Indian Railway Rule: प्लॅटफॉर्म तिकीट प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार देते. यामुळे प्रवाशाने ज्या स्थानकातून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे त्याच स्थानकावरून भाडे भरावे लागणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट : ट्रेनने कधी अचानक प्रवास करावा लागला आणि तुमच्याकडे तिकीट नसेल तर घाबरण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही आरक्षण नियमांशिवायही प्रवास करू शकता. यापूर्वी अशा परिस्थितीत, केवळ तत्काळ तिकीट बुकिंग नियमांचा पर्याय होता. पण त्यातही तिकीट मिळेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत रेल्वेचा एक खास नियम जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता या सुविधेअंतर्गत तुम्ही आरक्षणाशिवाय प्रवास करू शकता. प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुमचे आरक्षण नसेल आणि तुम्हाला ट्रेनने कुठेतरी जायचे असेल, तर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊनच ट्रेनमध्ये चढू शकता. त्यानंतर टीसीकडे जाऊन तुम्ही अगदी सहज तिकीट मिळवू शकता. हा नियम रेल्वेनेच बनवला आहे. यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन लगेच TTE शी संपर्क साधावा लागेल. त्यानंतर TTE तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत तिकीट तयार करेल. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे.

स्वस्तात घर बांधण्याची संधी; सळया, सिमेंट, रेती अनेक साहित्यांच्या किमतीत घट

संबंधित बातम्या

सीट रिकामी नसली तरी पर्याय ट्रेनमध्ये सीट रिकामी नसल्यास, TTE तुम्हाला राखीव सीट देण्यास नकार देऊ शकतो. पण, प्रवास थांबवू शकत नाही. जर तुमच्याकडे आरक्षण नसेल तर अशा परिस्थितीत प्रवाशाकडून 250 रुपये दंडासह, प्रवासाचे एकूण भाडे भरून तिकीट काढावे. रेल्वेचे हे महत्त्वाचे नियम जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. PPF Investment: कोट्याधीश होण्याची सरकारी स्कीम माहितीय का? आत्तापासून गुंतवणूक करा सुरू प्लॅटफॉर्म तिकीट प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याचा अधिकार देते. यामुळे प्रवाशाने ज्या स्थानकातून प्लॅटफॉर्म तिकीट काढले आहे त्याच स्थानकावरून भाडे भरावे लागणार आहे. भाडे आकारताना प्रवास सुरु केलेले स्टेशन देखील तेच मानले जाईल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच क्लास भाडे देखील द्यावे लागेल ज्यामध्ये तुम्ही प्रवास करणार आहात. जर तुमची ट्रेन कोणत्याही कारणाने चुकली तर TTE तुमची सीट पुढील दोन स्टेशनपर्यंत कोणालाही देऊ शकत नाही. म्हणजेच पुढील दोन स्थानकांवर तुम्ही ट्रेनच्या आधी पोहोचून तुमचा प्रवास पूर्ण करू शकता. पण लक्षात ठेवा, दोन स्टेशनांनंतर, TTE RAC तिकीट असलेल्या प्रवाशाला जागा देऊ शकते. पण तुमच्याकडे दोन स्टेशनचा पर्याय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या