JOIN US
मराठी बातम्या / मनी / रेल्वे प्रवासात पाच वर्षांखालील मुलांनाही फुल तिकीट काढावं लागणार? रेल्वे मंत्रालयाने म्हटलं...

रेल्वे प्रवासात पाच वर्षांखालील मुलांनाही फुल तिकीट काढावं लागणार? रेल्वे मंत्रालयाने म्हटलं...

मुंबई, 21 ऑगस्ट : देशभरात सुरक्षित आणि स्वस्त प्रवासासाठी रेल्वे हा महत्त्वाचा पर्याय आहे. मुलांसह आरामदायी प्रवासासाठी, भारतीय रेल्वे अनेक सुविधा पुरवते. अनेकदा रेल्वेच्या विविध नियमांमुळे प्रवासी गोंधळून जातात. अलीकडेच या संबंधित एक बातमी व्हायरल झाली होती की लहान मुलांसाठी रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र आता रेल्वे मंत्रालयाने हे वृत्त फेटाळले आहे. 4 वर्षाखालील मुलांनाही तिकीट काढावे लागेल का? काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मुलांसाठी तिकीट बुक करण्याच्या नियमात बदल केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट : देशभरात सुरक्षित आणि स्वस्त प्रवासासाठी रेल्वे हा महत्त्वाचा पर्याय आहे. मुलांसह आरामदायी प्रवासासाठी, भारतीय रेल्वे अनेक सुविधा पुरवते. अनेकदा रेल्वेच्या विविध नियमांमुळे प्रवासी गोंधळून जातात. अलीकडेच या संबंधित एक बातमी व्हायरल झाली होती की लहान मुलांसाठी रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र आता रेल्वे मंत्रालयाने हे वृत्त फेटाळले आहे. 4 वर्षाखालील मुलांनाही तिकीट काढावे लागेल का? काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मुलांसाठी तिकीट बुक करण्याच्या नियमात बदल केला आहे. या अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आता एक ते चार वर्षे वयोगटातील मुलांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागणार आहे. या बातम्या आणि मीडिया रिपोर्ट्स दिशाभूल करणारे असल्याचा दावा या PIB फॅक्ट चेकमध्ये करण्यात आला आहे.

ऑगस्ट महिना संपण्याआधी पूर्ण करा ‘ही’ कामं; आर्थिक नुकसान होणार नाही

रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, या बातम्या आणि मीडिया रिपोर्ट्स पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. एका प्रसिद्धीपत्रकात, मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या मुलांच्या तिकिटांच्या बुकिंगबाबत कोणतेही बदल केलेले नाहीत. प्रवाशांना मागणीनुसार तिकीट खरेदी करण्याचा आणि त्यांच्या 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी सीट बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे आणि जर त्यांना वेगळी सीट नको असेल तर ते पूर्वीप्रमाणे विनामूल्य आहे.

संबंधित बातम्या

Income Tax: करदाते अजूनही दंड न भरता ITR फाईल करु शकतात; ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले की, एका अहवालात दावा करण्यात आला आहे की भारतीय रेल्वे प्रवाशांना पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी पूर्ण तिकीट काढावे लागेल. मात्र पाच वर्षांखालील मुलांसाठी रेल्वे तिकीट खरेदी करणे ही पूर्णपणे पर्यायी सुविधा आहे. जर सीट बुक केली नसेल, तर पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. रेल्वेचा नियम काय आहे? रेल्वे मंत्रालयाच्या 6 मार्च 2020 च्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, पाच वर्षांखालील मुलांना मोफत प्रवास करता येईल. मात्र स्वतंत्र सीट दिली जाणार नाही. त्यामुळे स्वतंत्र सीटचा दावा केल्याशिवाय कोणतेही तिकीट खरेदी करण्याची गरज नाही. मात्र 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी वेगळी सीट हवी असल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या