JOIN US
मराठी बातम्या / मनी / विमातळाप्रमाणेच रेल्वे स्थानकात थर्मल स्क्रिनिंग;ज्येष्ठांना प्रवासाची परवानगी नाही, असा आहे रेल्वेचा पोस्ट लॉकडाऊन प्लॅन

विमातळाप्रमाणेच रेल्वे स्थानकात थर्मल स्क्रिनिंग;ज्येष्ठांना प्रवासाची परवानगी नाही, असा आहे रेल्वेचा पोस्ट लॉकडाऊन प्लॅन

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली रेल्वेसेवा 15 एप्रिलपासून सुरू होऊ शकते. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून प्रोटोकॉल तयार करण्यात येत आहे.

जाहिरात

मंगळवारी खासगी रेल्वेसाठी लिलाव करण्यापूर्वी कंपन्यांसह पहिल्या बैठकीत 16 कंपन्या सहभागी झाल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यात बॉम्बर्डिअर, कॅप इंडिया, आय-स्कायर कॅपिटल, IRCTC, BHEL, स्टर लाइट, मेधा, वेदांता, टेटला गर, BEML आणि RK असोसिएशन यांचा सहभाग आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 एप्रिल : कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली रेल्वेसेवा 15 एप्रिलपासून सुरू होऊ शकते. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून प्रोटोकॉल तयार करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसमुळे रेल्वेच्या काही नियमांमध्ये देखील बदल करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान काही नियमांचे पालन करूनच रेल्वे प्रवास करता येणार आहे. रेल्वेकडून सक्तीने या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. (हे वाचा- पोस्टाच्या या योजनेचा प्रीमियम भरण्याची मुदत वाढवली,13 लाख पॉलिसीधारकांना दिलासा ) जर 15 एप्रिलपासून रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तर काही कठोर नियमांचे पालन प्रवाशांना करावं लागणार आहे. जर प्रवासादरम्यान एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आले तर त्याबाबतीत कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्या व्यक्तील तातडीने रेल्वेतून उतरवण्यात येईल. दरम्यान या व्यक्तीला 100 रिफंड देण्यात येणार आहे. चालू  प्रवासादरम्यान या व्यक्तीमध्ये खोकला, सर्दी, ताप अशी कोरोनाची लक्षणं आढळून आली तर टीटीई आणि अन्य रनिंग स्टाफमार्फत या व्यक्तीला अर्ध्या रस्त्यातच उतरवण्यात येणार आहे. (हे वाचा- निवृत्तीनंतरही देशसेवा संपली नाही,जवानाने दान केले पेन्शन आणि बचतीचे 15 लाख ) या ट्रेन पूर्णपणे नॉन-एसी असणार आहेत. आवश्यकता असेल तरच मधल्या स्टेशनवर ट्रेन थांबवण्यात येईल, अन्यथा ट्रेन नॉन स्टॉप असेल. ट्रेनच्या डब्ब्यामधील साइड बर्थ रिकामी राहील,जेणेकरून सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन होईल. त्याचप्रमाणे एका केबिनमध्ये (सहा बर्थ मिळून एक केबिन असते) केवळ 2 प्रवासी प्रवास करतील. ट्रेनमध्ये मास्क वापरणे बंधनकारक रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात 307 ट्रेन सुरू करण्याची योजना आहे. यापैकी 133 ट्रेन्सचं आगाऊ बुकिंग सुरु झाल्यामुळे त्यांच्यासाठी वेटिंग आहे. ही वेटिंग लिस्ट रद्द करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क देण्यात येणार आहे. याकरता ठराविक शूल्क आकारण्यात येईल. हे मास्क वापरणे बंधनकारक आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना सुद्धा मास्क वापरणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे बाहेरून कुणीही आत येऊ शकत नाही. रेल्वेचे आणखी काही कडक नियम एअरपोर्टप्रमाणेच प्रवाशांना स्टेशनवर 4 तास आधी पोहोचावं लागेल. जेणेकरून प्रवाशांचं थर्मल स्क्रिनिंग करता येईल. केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी असेल. प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री होणार नाही. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार फक्त नॉन एसी ट्रेन (स्लीपर) चालणार आहे. प्रवासाच्या 12 तास आधी प्रवाशांना त्यांच्या आरोग्याबाबत माहिती रेल्वेला द्यावी लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास न करण्याबाबतचा सूचना रेल्वेकडून देण्यात येण्याची शक्यता आहे. संपादन- जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या