नवी दिल्ली, 11 जून: जर तुमच्यासोबत पैशांच्या (Money) बाबतीत फ्रॉड (fraud) झाला असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. तुमचे गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एक तक्रार करावी लागेल आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India post payment bank) म्हणजेच टपाल कार्यालयाने (post office) यासाठी फॉर्म सुरू केले आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीची तक्रार करून तुमच्या खात्यातून गहाळ झालेल्या पैशांसाठी क्लेम करू शकता. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने Simplified Standardized Claim Form लाँच केला आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही पैशांसाठी क्लेम करू शकता. पैशांसाठी कोण क्लेम करू शकतं? पोस्ट पेमेंट बँकेने याबद्दल सविस्तर माहिती देताना म्हटलंय की, जर ग्राहकांच पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट असेल आणि त्यांची फसवणूक झाली असेल, तर ते पैशांसाठी क्लेम करू शकतात. याशिवाय कॅश सर्टिफिकेट, मनी ऑर्डर, SOP आणि PLI/RPL मध्ये जर तुमची फसवणूक झाली असेल तरीही तुम्ही पैशांसाठी क्लेम करू शकता. पोस्ट ऑफिसने का काढला हा फॉर्म? आतापर्यंत पोस्ट ऑफिसमधील सर्वच सर्कलचे लोक त्यांच्या सोईप्रमाणे वेगवेगळ्या फॉर्मचा वापर करत होते. त्यांचा कंटेंटही वेगळा होता. त्यामुळे ही प्रक्रिया देशात एकसारखी करण्यासाठी हा फॉर्म लाँच करण्यात आला आहे.
तक्रार कशी करायची? - तुम्हाला तक्रार करायची असेल तर सर्वात आधी हा फॉर्म भरावा लागेल. - हा फॉर्म सबमिट करताना सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी द्यावी लागेल. - या फोटोकॉपीमध्ये Photo ID आणि Address proof देणं गरजेचं आहे. - याशिवाय तुम्हाला Passbook आणि Deposit receipt देखील द्यावी लागेल. - तसंच Original Passbook देखील सबमिट करावं लागू शकतं. - त्यानंतर बँकेकडून तुम्ही केलेल्या तक्रारीबद्दलची पूर्ण चौकशी केली जाईल.
या संपूर्ण प्रक्रियेस किती कालावधी लागणार? तुम्ही फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर या प्रक्रियेस 7 दिवस ते 25 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. तुम्ही केलेल्या तक्रारीवरून हा कालावधी ठरेल. तसंच जर एखाद्या तक्रारीच्या चौकशीत Forensic examinationची गरज पडली, तर तीन महिन्यांचा कालावधीही लागू शकतो.