JOIN US
मराठी बातम्या / मनी / Youtube वरुन कमावणाऱ्यांनो सावधान! पडू शकते इन्कम टॅक्सची रेड, करा 'हे' काम

Youtube वरुन कमावणाऱ्यांनो सावधान! पडू शकते इन्कम टॅक्सची रेड, करा 'हे' काम

Youtube : यूट्यूबवरुन झालेल्या कमाईला बिझनेसमधून झालेले उत्पन्न मानलं जातं. त्यावरही टॅक्स भरावा लागतो. जास्त कमाई झाल्यावर अकाउंटचं ऑडिटही कराव लागतं.

जाहिरात

यूट्यूबरवर पडली इन्कम टॅक्स रेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 जुलै : तुम्हीही यूट्यूबवरुन कमाई करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. यूट्यूबर्सलासावध करणारी ही बातमी आहे. तुम्ही तुमच्या कमाईचा पूर्ण हिशोब इन्कम टॅक्स डिपार्टमेटला देत टॅक्स जमा करायला हवा. यासोबतच तुम्हाला यूट्यूब वरुन पैसे कमावण्यासाठी तुम्ही कोणताही अवैध श्रेणीमध्ये येणारा व्हिडिओ बनवू नये. हा सल्ला आम्ही देत आहोत कारण यूपीच्या एका यूट्यूबरच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केलीआहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, या यूट्यूबरने अवैध पध्दतीने कमाई केली आहे. मात्र त्याने कोणत्या अवैध मार्गाने कमाई केली आहे हे आयकर विभागाने स्पष्ट केलेलं नाही.

हे प्रकरण बरेलीचे आहे. येथील तस्लीम नावाच्या युट्युबरच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. छाप्यात घरातून 24 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विभागाने ही रक्कम जप्त केली आहे. तस्लीमने आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून एक कोटी रुपये कमावले आहेत. YouTuber वर बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर तस्लीमच्या कुटुंबीयांनी या छाप्याला षडयंत्र ठरवत यूट्यूबवरून पैसे कमवणे हा गुन्हा नसल्याचे म्हटले आहे. यूट्यूबच्या कमाईवर 4 लाख रुपयांचा करही भरला आहे. SBI ची सुपरहिट स्कीम! डबल होतील तुमचे पैसे, मिळेल भरपूर रिटर्न तस्लीम शेअर बाजाराशी संबंधित व्हिडिओ बनवतो तस्लीमचा भाऊ फिरोज सांगतो की, तस्लीमचे यूट्यूब चॅनल ‘ट्रेडिंग हब 3.0’ आहे. या चॅनलवर त्याचा भाऊ शेअर मार्केटशी संबंधित व्हिडिओ अपलोड करतो. फिरोजचा दावा आहे की, त्याने यूट्यूबच्या 1.2 कोटी रुपयांच्या उत्पन्नातून 4 लाख रुपये टॅक्स भरला आहे. छापेमारी हा विचारपूर्वक केलेला कट आहे. आयकर विभागानेही अद्याप या छाप्याबाबत जास्त माहिती दिलेली नाही. Cardamom Farming: ‘या’ मसाल्याच्या शेतीने शेतकरी होऊ शकतात मालमाल, अशी करता येते लागवड youtube वरून कमाई करणे हे बिझनेस इन्कम मानले जाते cnbcTV18 च्या एका रिपोर्टनुसार, YouTube मधून मिळणारी कमाई ही बिझनेसमधून झालेले उत्पन्न मानली जाते. चार्टर्ड अकाउंटंट रुचिका भगत सांगतात की, एकूण उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल, तर YouTube ला आयकर कायद्याच्या कलम 44AB अंतर्गत कर भरावा लागतो. अकाउंट ऑडिट करणे आवश्यक आहे. हे काम न रजिस्टर्ड चार्टर्ड अकाउंटेंट करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या