आयटीआर फॉर्म
Income Tax Filing: जुलै महिना सुरू झाला आहे आणि 31 जुलै 2023 ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजेच, तुमच्याकडे आयटीआर फाइलिंगसाठी एका महिन्यापेक्षा कमी वेळी बाकी आहे. आयकर भरण्यासाठी सर्वात लोकप्रिय फॉर्मपैकी एक म्हणजे आयटीआर फॉर्म -1 जो सामान्य पगारदार लोक भरतात. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आयटीआर फॉर्म-1 हे सहज फॉर्म म्हणूनही ओळखले जाते.
आयटीआर फॉर्म-1 ‘या’ नोकरदार लोकांसाठी आहे भारतातील सामान्य टॅक्सपेयरच्या वतीने ITR फॉर्म-1 दाखल केला जाऊ शकतो. हा फॉर्म अशा लोकांसाठी आहे ज्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत सॅलरी, डिव्हिडेंड, बँक इंटरेस्ट किंवा फक्त एक घराची प्रॉपर्टी आहे आणि शेतीतून वार्षिक उत्पन्न 5000 रुपयांपेक्षा जास्त नाही. 50 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले टॅक्सपेयर्स हा फॉर्म भरू शकतात. Tax Rule : ‘या’ 6 प्रकारच्या उत्पन्नावर टॅक्स द्यायची नसते गरज! ITR भरण्याआधी अवश्य घ्या जाणून कोण ITR फॉर्म- 1 भरू शकत नाही -टॅक्सपेयरचे टॅक्स योग्य इन्कम 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर आयटीआर फॉर्म-1 तो भरू शकत नाही. त्यामुळे NRI ITR-1 दाखल करू शकत नाही. -जर एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंड, सोने, इक्विटी शेअर्स, हाऊस प्रॉपर्टी आणि इतर स्त्रोतांमधून उत्पन्न मिळवले तर तो ITR-1 भरू शकत नाही. -यासोबतच जर एखाद्या व्यक्तीने सट्टा मालमत्ता किंवा घोड्यांच्या शर्यती, लॉटरी, कायदेशीर जुगार किंवा इतर सेवांमधून कमाई केली असेल, तर ते ITR-1 दाखल करण्यास देखील पात्र नाहीत. -एखाद्या व्यक्तीचे एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून उत्पन्न असल्यास, तो ITR-1 दाखल करू शकत नाही. याशिवाय एनआरआय किंवा देशातील अनिवासी देखील ITR-1 दाखल करण्यास अपात्र आहेत. -तसेच, बँकेतून पैसे काढताना तुमच्यावर 194N नुसार TDS आकारला गेला असेल, तर तुम्ही ITR-1 फॉर्म वापरण्यासही अपात्र असाल. शिवाय, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUFs) देखील ITR-1 दाखल करू शकत नाहीत. ITR Filling 2023: टॅक्स वाचवण्यात अडचणी येताय? या 10 पद्धतींनी वाचतील लाखो रुपये पात्र नसतानाही ITR-1 भरण्याचे तोटे जर कोणी चुकून आयटीआर फॉर्म-1 भरला तर आयकर विभागाकडून नोटीसही येऊ शकते. सुधारित आयटीआर नोटीसच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत दाखल करणे आवश्यक आहे. असे न केल्यास, तुम्ही भरलेला हा आयटीआर अवैध मानला जाईल.