काही गोष्टी नव्याने सुरु करा. दोघांपैकी एकाने नोकरी गमावली तर, घराच्या बजेटमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. आपल्या येणाऱ्या पगाराप्रमाणे आपण आपले खर्च ठरवत असतो. घराचे हप्ते, काही प्लॅनिंग खराब होतात पण, या नकारात्मक परिस्थितीतही शांत राहा.
नवी दिल्ली, 27 एप्रिल : सेव्हिंगसाठीची एक योजना अशी आहे, ज्यात 150 रुपये 15 लाख रुपयांत बदलले जाऊ शकतात. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली, तर चांगल्या रिर्टन्ससह 3 स्तरांवर टॅक्समध्येही फायदा मिळेल. या योजनेचं नाव पब्लिक प्रॉविडेंट फंड (PPF) आहे, ज्यात गुंतवणुकीवर वार्षिक 7.1 टक्के व्याज दर मिळतो. गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 3 स्तरावर टॅक्समध्ये फायदा मिळतो. पहिलं, गुंतवणूक केल्यानंतर डिडक्शनचा फायदा, दुसरं, इंटरेस्टवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. आणि तिसरं, मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम टॅक्स फ्री असते. PPF स्किममध्ये जर महिन्याला 4500 रुपये म्हणजेच दिवसांला 150 रुपये गुंतवणूक केल्यास, 15 वर्षात मॅच्युरिटीवर सध्याच्या व्याज दराच्या हिशोबाने 14 लाख 84 हजार रुपये मिळतील. म्हणजेच एकूण 8,21,250 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 वर्षानंतर 14.84 लाख रुपये मिळतील.
या योजनेमध्ये दर महिन्याला अधिकाधिक दीड लाख आणि कमीत-कमी 500 रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते. PPF ला सरकारी सुरक्षा मिळते.
PPF दर महिन्याला व्याजाची गणना 5 तारखेच्या बॅलेन्सच्या आधारे करते. त्यामुळे दर महिन्याच्या 5 तारखेला गुंतवणूक केल्यास, फायदा होऊ शकतो. तसंच यात एक दिवसही चूक झाल्यास, संपूर्ण 25 दिवसांसाठी व्याजाचा लाभ मिळणार नाही. जर हीच चूक दर महिन्याला केल्यास 365 दिवसांपैकी 300 दिवसांसाठी व्याजाचा लाभ मिळणार नाही.