नवी दिल्ली, 04 जुलै: आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ही देशातील दुसरी मोठी खाजगी बँक आहे. बँकेकडून त्यांच्या ग्राहकांसाठी वेळोवेळी बँकिंगसंदर्भात अलर्ट पाठवण्यात येतात. ICICI ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. दरम्यान बँकेने एका अशा बँकिंग फ्रॉडबाबत अलर्ट केलं आहे, ज्याविषयी खूप कमी ग्राहकांना माहित असतं. बँकेने ग्राहकांना स्विम स्वॅपच्या (Sim Swap Fraud) माध्यमातून होणाऱ्या फ्रॉड संदर्भात सावध केलं आहे. याकरता बँकेने काही टीप्स देखील शेअर केल्या आहेत. बँकेने काय केलं ट्वीट? बँकेने बँकिंग करताना सुरक्षितता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. बँकेने असं म्हटलं आहे की दीर्घकाळासाठी तुमच्या फोनमध्ये नेटवर्क नसेल, अलर्ट किंवा कॉल्स येत नसतील तर त्वरित तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरशी संपर्क करा. हा सिम स्वॅप फ्रॉडचा प्रकार असू शकतो असा अलर्ट आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना दिला आहे. इतरही बँकांच्या ग्राहकांनी याबाबत सावधानता बाळगणे आवश्यक आहे. हे वाचा- पोस्ट ऑफिसच्या PPF, SSY, NSC सह या 8 योजनांमध्ये पैसे होतील दुप्पट, वाचा सविस्तर
सिम स्वॅप म्हणजे काय? सध्या बहुतांश ग्राहक मोबाइल बँकिंगकडे वळले आहेत. सोपं आणि सहज वापर असल्याने मोबाइल बँकिंगकडे कल वाढला आहे. मोबाइल बँकिंगचा वापर करताना खात्यासंदर्भातील अलर्ट, ओटीपी, URN इ. ची आवश्यकता असते. अशावेळी काही भामटे चुकीच्या पद्धतीने लोकांच्या खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी सिम स्वॅपचा वापर करतात. हे वाचा- 62 लाख पेन्शनर्ससाठी Good News! पेन्शन रकमेसंदर्भात सरकारने घेतला हा निर्णय यामध्ये ही फसवणूक करणारी व्यक्ती मोबाइल सेवा प्रदात्याद्वारे तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकासाठी (जो क्रमांक बँकेत रजिस्टर्ड आहे) नवीन सिम कार्ड मिळवते. जेणेकरून हे अलर्ट, ओटीपी त्याच्याकडे असणाऱ्या सिमकार्डवर जातात आणि या द्वारे तुमच्या खात्यावर डल्ला मारला जातो. त्यामुळे अशाप्रकारे कोणताही संशय आल्यास सावधानता बाळगण्याचा सल्ला बँकेकडून देण्यात आला आहे.