JOIN US
मराठी बातम्या / मनी / आधार अपडेट करायचंय? 'अशी' आहे सोपी पद्धत

आधार अपडेट करायचंय? 'अशी' आहे सोपी पद्धत

Aadhar Card - आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर पाहा सोपी पद्धत

जाहिरात

समजा तुमचा आधार क्रमांक 123456789123 आहे आणि पॅन क्रमांक ABCDE1234F आहे. तुम्हाला UIDAPAN 123456789123 ABCDE1234F लिहून SMS करा. त्यावरून तुम्हाला स्टेटस कळेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 सप्टेंबर : हल्ली प्रत्येकासाठी आधार कार्ड गरजेचं झालंय. अनेकांकडच्या आधारमध्ये चुकीची माहिती आहे. अशा वेळी आधार अपडेट करणं आवश्यक आहे. तुम्ही आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पाठवलं असेल तर प्रोसेस कुठवर गेलाय, हे कसं पाहायचं हे जाणून घेऊ- आधारसाठी अप्लाय, इनराॅल केल्यानंतर आधार तयार व्हायला 90 दिवस लागतात. दरम्यान तुम्ही UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन आधार स्टेट्स तपासू शकता. अपडेशनसाठीही असंच आहे. यासाठी तुमच्याकडे आधार सेंटरकडून मिळालेली इनराॅलमेंट स्लिप हवी. ‘या’ मुस्लीम देशाच्या नोटेवर विराजमान आहेत गणराया काय आहे प्रक्रिया? पहिल्यांदा https://uidai.gov.in/ वर जा. माय आधार सेशनमध्ये चेक आधार स्टेटसवर क्लिक करा. यात इनराॅलमेंट नंबर टाका. हा 14 अंकी नंबर आहे. हा नंबर इनराॅलमेंट स्लिपच्या टाॅपवर असतो. सोबत इनराॅलमेंटचा दिवस, वेळही असते. हे दोघं एकत्र करून इनराॅलमेंट आयडी तयार होतो. LIC नं लाँच केली नवी पाॅलिसी, ‘हे’ आहेत फायदे इनराॅलमेंट नंबर, आयडी टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाका. चेक स्टेट्सवर क्लिक करा तुमचं आधार कार्ड प्रोसेसमध्ये असलं तर तसा मेसेज दिसेल. तयार झालं तर तसा मेसेज दिसेल. तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर्ड असेल, तर आधार तयार झाल्यावर तुम्हाला UIDAI कडून मेसेज येईल. तुम्ही वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करू शकता. या प्रकारेही करू शकता चेक आधार कार्ड तपासण्यासाठी दुसरी पद्धतही आहे. UIDAI ची हेल्पलाइन 1947 आहे. तिथे तुम्हाला माहिती मिळू शकते. SBI मध्ये 56 जागांवर व्हेकन्सी, ‘असा’ करा अर्ज इनराॅलमेंट स्लिप हरवली तर वापरा ही पद्धत इनराॅलमेंट स्लिप हरवली तरी पुन्हा मिळू शकते. पण त्यासाठी तुमचा फोन नंबर रडिस्टर्ड हवा. तुम्ही uidai.gov.in क्लिक करा. नंतर जरुरी माहिती भरा. तुम्हाला OTP येईल. तो टाकून व्हेरिफाय झाल्यावर इनराॅलमेंट नंबर फोन किंवा ईमेलवर येईल. पाहा पुण्यातील गणपतीचा थाट, मिरवणुकीची खास ड्रोन दृश्यं VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या