मुंबई: अडीनडीच्या काळात आपल्याला पैसे साठवण्यासाठी काहीतरी योजने हवी असते. ते पैसे आपण हवे तेव्हा मोडूही शकतो असा काही पर्याय पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही RD चा विचार करू शकता. दर महिन्याला ठरावीक रक्कम तुम्ही RD साठी जमा करायची असते. RD उघडण्याचा काय फायदा? तुम्ही दर महिन्याला ठरावीक रक्कम तुमच्या खात्यावर ठेवू शकता. तुम्हाला ऑटो डेबिटचा पर्याय ठेवता येतो. किमान 500 रुपयांपासून तुम्हाला RD सुरू करता येते. अगदी 9 महिन्यांपासून ते दीड वर्षांपर्यंत तुम्ही हे पैसे बाजूला काढून ठेवू शकता. तुम्ही हे पैसे तुम्हाला हवे तेव्हा मोडू शकता. त्यासाठी ठरावीक रक्कम पेनल्टी म्हणून आकारली जाते. मात्र तुम्ही ही RD मोडू शकता. यामध्ये तुम्हाला आणखी एक पर्याय मिळतो. RD मॅच्युअर झाल्यानंतर तुम्ही थेट खात्यावर रक्कम घेण्यापेक्षा ती FD मध्ये कन्व्हर्ट करू शकता. त्याचा एक फायदा असाही आहे की तुम्ही दर महिन्याला साधारण 1000 रुपये बाजूला काढले आणि एक वर्षांसाठी ठेवले तर वर्षाचे १२००० रुपये होतील. हे पैसे तुम्ही FD ला ट्रान्सफर करण्याचा पर्याय दिला तर ते पैसे लाँग टर्मसाठी तुमच्या कामी येतील.
यूपीआय पेमेंट चुकीच्या बँक खात्यावर गेल्यास पैसे परत कसे मिळवावे? जाणून घ्याऑनलाइन RD खातं कसं उघडायचं? उदाहरणासाठी आपण HDFC बँक घेऊया. पहिल्यांदा बँकेच्या साईटवर जा. तिथे तुम्ही तुमचा कस्टमर आयडी आणि पासवर्ड अपलोड करा. त्यानंतर नवीन पेज दिसेल. डाव्या कोपऱ्यात तुम्हाला ट्रान्झॅक्ट असा पर्याय येईल. तिथे ओपन रिकरिंग डिपॉझिट पर्याय दिसेल. तिथे क्लीक करा. पुन्हा एक नवीन विंडो दिसेल. तिथे तुमच्या खात्यावरची रक्कम किती आहे ते दिसेल. तुमच्या ब्रांचचं नाव येईल. तुम्हाला इंस्टॉलमेंट किती रक्कम द्यायची आहे ते दिसेल. तिथे तुम्ही 500, 1000 तुम्हाला जेवढी रक्कम वाटते तेवढी अपलोड करा. मॅच्युरिटीनंतरच्या इंट्रक्शन लिहा.
सणासुदीमुळे आर्थिक बजेट बिघडलं? काळजी नको, गाडी रुळावर आणण्याचा हा आहे प्रभावी मार्गतुम्हाला किती महिन्यांसाठी RD सुरू करायची आहे ते देखील इथे तुम्ही लिहा. त्यानंतर पुढे दिलेली माहिती भरा आणि तुमचं RD खातं सुरू करा. तुमच्य खात्यातून रक्कम वजा होईल आणि RD खातं सुरू होईल. जर तुम्ही RD ची रक्कम चुकवली तर तुम्हाला पेनल्टी बसते.
ऑफलाईन RD कशी सुरू करायची? ऑफलाईन RD साठी तुम्हाला बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. ती RD तुम्ही बँकेतील फॉर्म भरून आणि सहीनिशी सुरू करू शकता. मात्र ती तुम्हाला ऑनलाइन मोडता येईलच असं नाही. काही बँकांच्या नियमानुसार तुम्हाला ऑफलाईन उघडलेली RD ही बँकेत जाऊनच बंद करता येते. अन्यथा ती पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागते.