मुंबई : पगार आला की उडवला अशी स्थिती अनेकांची होते. त्यामुळे काही सवयी या अंगवळणी असायला हव्यात. हे वर्ष तर सरत आलं, पण नव्या वर्षात काही चांगल्या सवयी आपल्या अंगी लावणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे एकप्रकारची शिस्त लावणं गरजेचं आहे. जर तुम्ही योग्य नियोजन केलं नाही तर तुमचं दीर्घकाळासाठी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे नव्या वर्षात पगारासोबत काही शिस्तीच्या गोष्टी अंगी बाळगायला हव्यात. ज्यामुळे तुमचं भविष्य अधिक सुरक्षित राहू शकेल. SBI ने याबाबत महत्त्वाची माहिती आपल्या ग्राहकांना दिली आहे. योग्य पद्धतीने नियोजन कसं करायचं याचा सल्ला SBI ने दिला आहे. तुमचे पेमेंट प्रोसेस नीट ठेवा. त्यामध्ये घोळ घालू नका. पगारापेक्षा जास्त मोठा EMI घेऊ नका. त्यामुळे तुमच्यावर आर्थिक बोजा वाढेल आणि तुमच्या हातात पैसे राहणार नाहीत. सगळे पेमेंट योग्य वेळेत करा. त्यामुळे तुम्हाला लेट चार्ज लागणार नाही. तुम्ही पेमेंट उशिरा केलं तर तुमच्या क्रेडिट हिस्ट्रिवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट स्कोअर देखील निगेटिव्ह होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा लोन घेण्यात अडचणी येऊ शकतात.
मोठी बातमी! नव्या बजेटमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये होणार बदल?योग्य वेळेत तुम्हाला आलेलं बिल भरलं तर त्यामुळे तुमच्या क्रेडिट हिस्ट्री चांगली राहाते. तुमचा क्रेडिट स्कोअर जेवढा चांगला तेवढं जास्त आणि लगेच लोन मिळण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे ही काळजी नेहमी घ्या.
SBI ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या सुविधा आणत असते. SBI ने ग्राहकांसाठी YONO अॅपवरून पेमेंट करणाऱ्यांसाठी काही खास ऑफर आणल्या आहेत. तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता.