मुंबई: SBI बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असते. आता ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण काही ना काही प्लॅन करत आहेत. तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तुमच्या फायद्याची ही बातमी आहे.
तुम्ही नव्या वर्षाआधी सेलमध्ये जर खरेदी करणार असाल तर तुम्हाला SBI च्या YONO App वरून पेमेंट केल्यास वेगवेगळे डिस्काउंट मिळणार आहेत. तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी SBI चे ग्राहक असाल तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.
क्रोमामध्ये तुम्ही जर खरेदी केली आणि SBI YONO app वरून पेमेंट केलं तर तुम्हाला 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे.
TATA CLiQ वर तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत ऑफर्स मिळणार आहेत. ज्याचा आनंद घेऊन तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता आणि खरेदीचा आनंदही द्विगुणीत करू शकता.
फ्लिपकार्डसाठी हा डिस्काउंट 5 टक्के ठेवण्यात आला आहे. आता वर्ष संपताना सेल सुरू होऊ शकतो. त्यावेळी तुम्ही जर YONO वरून पेमेंट केलं तर तुम्हाला हा अधिक डिस्काउंट मिळू शकतो.