क्रेडिट स्कोअर
मुंबई, 18 मे: चांगला क्रेडिट स्कोअर ठेवण्यासाठी, तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. क्रेडिट स्कोअर वेळोवेळी पाहत राहिल्याने आपल्याला कल्पना असते की, तो किती असायला हवा. हाय CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअरवरुन कळतं की, तुम्ही आर्थिकदृष्ट्या जबाबदार आणि स्थिर आहात, तुमची बिले वेळेवर भरतात. दुसरीकडे, स्कोअर कमी असल्यास, बँक तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्यास नकार देऊ शकते.
तुमचा क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी तुमच्याकडे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. CIBIL च्या वेबसाइट सोबतच, असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जे तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर तपासण्याचा ऑप्शन देतात. तुम्ही Google Pay वापरत असल्यास, तुम्ही याद्वारे तुमचा CIBIL स्कोअर देखील तपासू शकता. Google Pay हे पेमेंट अॅप आहे, ज्यावर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता. पूर्वी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला फक्त पेमेंट करण्याचा पर्याय मिळत होता. परंतु यावर तुम्हाला क्रेडिट स्कोअर तपासण्याचा पर्यायही मिळतो. तुम्ही गुगल अॅपवर सिबिल स्कोअर मोफत तपासू शकता, त्याची प्रोसेस काय आहे हे जाणून घेऊया.
Zomato ची यूपीआय सर्व्हिस लॉन्च, पेमेंटसाठी दुसऱ्या अॅपवर रीडायरेक्टची गरज नाही!- सर्वात आधी Google Play Store किंवा App Store वरून Google Pay अॅप डाउनलोड करा. - तुमच्या Google अकाउंटवरुन साइन इन करा आणि तुमचा फोन नंबर टाका. - ऑन-स्क्रीन इंस्ट्रक्शंस फॉलो करून तुमच्या Google Pay अकाउंटमध्ये बँक अकाउंट अॅड करा. - तुम्ही तुमच्या Google Pay अकाउंटवर त्याच मोबाइल नंबरवरून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड देखील अॅड शकता.
-Google Pay अॅप उघडा. -खाली स्क्रोल करा आणि ‘Manage Your Money’ या सेक्शनमध्ये या. -येथे तुम्हाला “Check your CIBIL score for free” हा ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा. -येथे तुम्हाला क्रेडिट स्कोअर तपासण्यास सांगितले जाईल, याच्या खाली तुम्ही चेक करण्याचा ऑप्शन निवडू शकता. -तुम्हाला तुमचे पूर्ण नाव येथे द्यावे लागेल, येथे तुम्हाला तेच नाव द्यावे लागेल जे तुमच्या पॅन कार्डमध्ये आहे. -डीटेल्स टाकून कंटीन्यू केल्यानंतर तुमचा सिबिल स्कोअर स्क्रीनवर दिसेल. तुमच्या CIBIL स्कोअरनुसार, तुम्हाला टिप्स, कॉमेंट इत्यादी देखील दिल्या जाऊ शकतात. Google Pay म्हणते की अॅपद्वारे क्रेडिट स्कोअर तपासल्याने तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होत नाही.
Whatsapp आणि Paytm देखील तुम्हाला CIBIL स्कोर तपासण्याची सुविधा देतात. क्रेडिट स्कोअर आणि डेटा अॅनालिटिक्स देणारी कंपनी एक्सपेरियन इंडियाने गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपद्वारे मोफत क्रेडिट स्कोअर पाहण्याची सुविधा सुरू केली. यासोबतच, तुम्हाला पेटीएमवर CIBIL स्कोर तपासण्याचा पर्याय देखील मिळतो, ही एक सोपी प्रोसेस आहे.
- तुमच्या पेटीएम अॅपमध्ये लॉग इन करा. - होम स्क्रीनवरील शो आयकॉनवर टॅप करा - ‘फ्री क्रेडिट स्कोअर’ वर टॅप करा - आता तुमचा पॅन कार्ड नंबर आणि जन्मतारीख टाका. - सबमिट वर क्लिक करा. तुमचा क्रेडिट स्कोअर दिसेल.