JOIN US
मराठी बातम्या / मनी / सनी लिओनीसह राजकुमार रावसोबत पॅन कार्ड फ्रॉड; तुमच्या PAN Card चा चुकीचा वापर होत नाही ना? असं तपासा

सनी लिओनीसह राजकुमार रावसोबत पॅन कार्ड फ्रॉड; तुमच्या PAN Card चा चुकीचा वापर होत नाही ना? असं तपासा

पॅन कार्डचा चुकीचा वापर केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात तुमच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर तर होत नाही ना, याची माहिती असणं आवश्यक आहे. घरबसल्या समजून घ्या पॅन कार्डची ट्रान्झेक्शन हिस्ट्री -

जाहिरात

आता पॅन कार्ड नंबर टाका आणि Verify Your Identity पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर काही आवश्यक माहिती भरा आणि फी भरुन अकाउंट लॉगइन करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 एप्रिल : परमनेंट अकाउंट नंबर अर्थात पॅन कार्ड (PAN Card) अतिशय महत्त्वाचं सरकारी डॉक्युमेंट आहे. पॅन कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जारी केलं जातं. पॅन कार्डमध्ये 10 अंकी यूनिक अल्फान्यूमरिक नंबर असतो. पॅन कार्डचा वापर न केवळ टॅक्ससंबंधित कामांसाठी केला जातो, तर ओळखपत्र रुपातही पॅन कार्ड वापरलं जातं. मागील काही दिवसांपासून अनेकांच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनंतर बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर केला गेला. त्यांच्या पॅन कार्डचा वापर करुन त्यांच्या नावे लोन घेतलं गेलं. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या होत्या. अशात तुमच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर तर होत नाही ना, याची माहिती असणं आवश्यक आहे.

हे वाचा -  नववर्षात Cibil Score चांगला ठेवण्याचा संकल्प करा आणि स्वत:चं क्रेडिट वाढवा, या स्टेप्स करा फॉलो

राजकुमार रावने 2 एप्रिल रोजी ट्विट करत सांगितलं, की ‘माझ्या पॅन कार्ड गैरवापर करुन कोणी 2500 रुपयांचं लहानसं लोन माझ्या नावे घेतलं आहे. त्यामुळे माझा सिबिल स्कोर खराब होईल’. ही पोस्ट सिबिल ऑफिशियलला टॅग करुन राजकुमार रावने याबाबत योग्य ती पावलं उचलण्याची विनंती केली आहे. घरबसल्या समजून घ्या पॅन कार्डची ट्रान्झेक्शन हिस्ट्री - - तुमच्या पॅन कार्डची हिस्ट्री चेक करण्यासाठी सर्वात आधी https://www.cibil.com/ वर जा. - Get Your Cibil Score पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर सब्सक्रिप्शन प्लॅनमध्ये एकाची निवड करा. - आता तुमचा मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि ईमेल आयडी अशी माहिती भरा. त्यानंतर लॉगइनसाठी पासवर्ड तयार करा. त्यानंतर Income Tax ID ची निवड करा. - आता पॅन कार्ड नंबर टाका आणि Verify Your Identity पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर काही आवश्यक माहिती भरा आणि फी भरुन अकाउंट लॉगइन करा. आता समोर एक फॉर्म येईल, त्यावरुन तुमच्या अकाउंटवर किती लोन आहे याची माहिती मिळेल. - जर तुमच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर झाला असेल, तर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर तक्रार दाखल करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या