JOIN US
मराठी बातम्या / मनी / Petrol diesel Price : पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? सरकार घेऊ शकतं हा मोठा निर्णय

Petrol diesel Price : पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? सरकार घेऊ शकतं हा मोठा निर्णय

Petrol and diesel price: सतत वाढणार्‍या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनंतर सर्वसामान्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत तीन अंकी म्हणजेच 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे.

जाहिरात

petrol

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 मार्च: पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol diesel Price) दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. देशाच्या खूप साऱ्या प्रमुख शहरात पेट्रोलने तीन अंकी आकडा केव्हाच पार केला आहे. या पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. आता सर्वसामान्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकार लवकरच उत्पादन शुल्क (Excise Duty) कमी करू शकेल. तज्ज्ञांच्या मते, सरकार लवकरच आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय जाहीर करू शकतं. सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या आयात शुल्कामध्ये प्रति लिटर 8.50 रुपयांची कपात करू शकते. असं वृत्त लाइव्ह मिंटने दिलं आहे. सध्याच्या काळात परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार सध्या एवढंच शुल्क कमी करू शकतं. कारण यापेक्षा जास्त कपात केली तर त्याचा परिणाम टॅक्सच्या महसुलावर होईल. हे वाचा -  EPFO चा मोठा निर्णय! नोकरदारांच्या PF वरील व्याजदर निश्चित; पाहा किती बदलला रेट इन्व्हेस्टमेंट फर्म ICICI Securities च्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पेट्रोल आणि डिझेलद्वारे कर संकलनाचे लक्ष्य सुमारे 3.2 लाख कोटी रुपये निश्चित केलं गेलं आहे. त्याचबरोबर सध्याच्या उत्पादन शुल्कानुसार सरकारला सुमारे 4.35 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. हेच लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून सरकार ड्युटीमध्ये सुमारे 8.50 रुपयांची कपात करू शकते. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकेल. कोरोना साथीच्या नंतर केंद्र सरकारने पेट्रोलवर उत्पादन शुल्कात 13 रुपये आणि डिझेलवर 16 रुपये प्रतिलिटर वाढ केली, त्यानंतर पेट्रोलवरील शुल्क 32.9 रुपये आणि डिझेलवरील शुल्क 31.8 रुपये एवढं झालं होत. हे वाचा -  नोकरी करता करता सोप्या पद्धतीनं पैसे कमवा; ‘हे’ गुंतवणुकीचे पर्यात ठरतील फायदेशीर फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत 16 दिवस वाढ झाली आहे, त्यानंतर पेट्रोल 04.74 रुपयांनी महाग झालं आहे. मुंबईमध्ये तर पेट्रोल 97.57 रुपयांवर आहे तर दुसरीकडे भोपाळमध्ये एक्सपी पेट्रोलची (XP Petrol) किंमत 102.12 रुपये आहे. याचबरोबर देशातील सर्वच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत (All Time High Price) ही दिवसेंदिवस आकाशाला भिडत आहे. यावर्षी फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीबद्दल बोललो तर 25 दिवसांत पेट्रोल तब्बल 3.36 रुपयांनी महाग झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या