JOIN US
मराठी बातम्या / मनी / लग्नसराईच्या काळात पुन्हा कमी झाले सोन्याचांदीचे दर, वाचा काय आहेत आजच्या किंमती

लग्नसराईच्या काळात पुन्हा कमी झाले सोन्याचांदीचे दर, वाचा काय आहेत आजच्या किंमती

Gold-Silver Price : सोन्याचांदीच्या दर आज पुन्हा कमी झाले आहेत. वाचा काय आहेत आज किंमती कमी होण्याचं कारण

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थीर असल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. चांदीच्या किंमतीत  आज कमी प्रमाणात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही धातूंचे दर स्थीर स्तरावर आहेत. सोन्याचे आजचे भाव (Gold Price on 11th December 2020) दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर 102 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 48,594 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 48,696 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,836 डॉलर प्रति औंस झाले आहेत. चांदीचे आजचे भाव  (Silver Price on 11th December 2020) सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीमध्ये देखील आज घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी चांदीचे दर किरकोळ फरकाने कमी झाले आहेत. चांदीच्या दरात आज 16 रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो 62,734 रुपये झाले आहेत. (हे वाचा- RBI चा देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेला झटका! ठोठावला 10 लाखांचा दंड ) याआधीच्या सत्रामध्ये चांदीचे दर प्रति किलो  62,750 रुपये इतके होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर (International Market) चांदीचे दर 23.92 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा- SWIGGY चा नवा प्लॅन! कोरोनाचा फटका बसलेल्या या वर्गाला जोडणार, मिळेल रोजगार ) सोन्याचांदीच्या किंमती कमी होण्याची कारणं एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल (Tapan Patel) यांच्या मते आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये कमजोरी पाहायला मिळते आहे. गुंतवणुकदारांना अमेरिकेतील प्रोत्साहन पॅकेजची प्रतीक्षा आहे. याशिवाय कोरोना व्हायरस व्हॅक्सिनबाबत येणाऱ्या सकारात्मक बातम्यांचा देखील सोन्याच्या किंमतीवर परिणाम होत आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या