जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SWIGGY चा नवा प्लॅन! कोरोनाचा फटका बसलेल्या या वर्गाला जोडणार, मिळेल रोजगार

SWIGGY चा नवा प्लॅन! कोरोनाचा फटका बसलेल्या या वर्गाला जोडणार, मिळेल रोजगार

SWIGGY चा नवा प्लॅन! कोरोनाचा फटका बसलेल्या या वर्गाला जोडणार, मिळेल रोजगार

पंतप्रधान स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी (PM-SVANidhi) योजनेचा Swiggy कडून देशातील 125 शहरांमध्ये करण्यात येणार आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 डिसेंबर: खाद्यपदार्थ घरपोच मागवण्याची ऑनलाईन सेवा देणारी कंपनी स्विगी (Swiggy) आता पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (PM-Svanidhi) अंतर्गत स्ट्रीट व्हेंडर्स (Street Vendors)  अर्थात रस्त्यावर टपरी, स्टॉल्सच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष योजना राबवणार आहे. 125 शहरांमध्ये ही योजना सुरू करण्यात  येणार असल्याची घोषणा गुरुवारी कंपनीनं केली. ‘कोविड 19’च्या (Covid 19) साथीमुळे लागू करण्यात लॉकडाउनचा (Lockdown) मोठा फटका रस्त्यावर छोटे स्टॉल्स चालवणारे, फिरते विक्रेते यांना बसला. त्यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा सुरू करता यावेत, यासाठी केंद्र सरकारनं स्वस्त दरात कर्ज पुरवठा करणारी ही योजना सुरू केली होती. याच योजनेअंतर्गत अशा छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी स्विगीनं (Swiggy) पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 36 हजार स्ट्रीट वेंडर्सना जोडण्यात येणार आहे. यासाठी स्विगीनं गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाच्या सहकार्यानं अहमदाबाद, वाराणसी, चेन्नई, दिल्ली आणि इंदूरमध्ये एक पायलट प्रकल्प राबवला होता. या अंतर्गत 300 पेक्षा जास्त छोटे व्यावसायिक स्विगीशी जोडले गेले आहेत. कंपनीशी जोडल्या जाणाऱ्या स्ट्रीट वेंडर्सना भारतीय अन्नपदार्थ सुरक्षा मानांकन प्राधिकरणाच्या मान्यतेसह अन्न सुरक्षितेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचे  प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल, असं कंपनीनं म्हटलं आहे. (हे वाचा- POST OFFICE हे काम आज करा पूर्ण,मिनिमम बॅलन्स नसल्यास खात्यातून कापले जाणार पैसे ) स्विगीचे सीओओ विवेक सुंदर म्हणाले, ‘लोकांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीनं घरपोच पोहोचवण्याची सेवा आम्ही देत आहोतच, आता ग्राहकांना आम्ही आवडतं स्ट्रीट फूडही घरपोच देणार आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. रस्त्यावर टपरी किवा हातगाडीवरील खाद्यपदार्थ खाणे हा भारतीय खवय्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. आता स्विगी त्यांनाही आपल्या ऑनलाईन सेवेचा लाभ देणार आहे.’ असा उपक्रम राबविण्यासाठी केंद्रीय मंत्रालयानं स्विगीला ही संधी दिली त्याबद्दल सरकारचे आभारी असल्याचंही  विवेक सुंदर यांनी सांगितलं. कुणाला आणि किती मिळेल कर्ज? पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत कमाल दहा हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते. यामध्ये कोणत्याही गॅरंटीची जरुरत नाही. अगदी सोप्या अटींसह हे कर्ज मिळेल, त्यामुळं व्यवसाय सुरू करणं शक्य होईल. रस्त्यावरील, रेल्वे स्थानकाजवळ टपरी, स्टॉलवर खाद्यपदार्थ, फळे, भाजीपाला विकणारे, लाँड्री, सलून, पानटपरी चालवणारे अशा छोट्या व्यावसायिकांना हे कर्ज मिळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: food , swiggy
  • First Published :
जाहिरात
जाहिरात