JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, आतापर्यंत 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, आतापर्यंत 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं

Gold Silver Price, 12 May 2021: सोन्याचांदीची खरेदी करण्याची सध्या चांगली संधी आहे. आज बुधवारी सुरुवातीच्या सत्रात सोन्याच्या दरात 0.18 टक्क्यांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 मे: भारतीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या किंमतीत  (Gold Silver Price) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याची वायदे (Gold Price Today) किंमत 0.18 टक्केने कमी होऊन  47,548 प्रति तोळा झाली आहे. तर चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज घसरण पाहायला मिळाली. चांदीचे दर 0.60% ने घसरून 71,500 रुपये प्रति किलो झाले आहेत. जर तसं पाहिलं गेलं तर सोन्याचे दर आजही रेकॉर्ड स्तरावरून खूप कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. त्या स्तरावरून सोन्याचे दर साधारण 9000 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट गोल्डची किंमत 0.2 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर  1,832.73 डॉलर प्रति औंस झाले आहेत. अमेरिकेत सोन्याची वायदे किंमत 0.1 टक्क्याने कमी होत 1,834.30 डॉलरवर पोहोचली आहे. तर चांदीचे दर 0.6 टक्क्यांनी कमी होत  27.47 डॉलर प्रति औंस झाले आहेत. प्लॅटिनमचे दर 0.5 टक्क्याने कमी होत 1,228.68 डॉलर झाले आहेत. (हे वाचा- स्वस्तात करा घरखरेदी! 12 मे रोजी ही सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी ) वर्षाअखेर सोन्याचांदीचे दर वाढणार आयआयएफएल सिक्‍योरिटीज (IIFL Securities)  चे अनुज गुप्ता यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलं आहे की, सर्व बेस मेटल कॉम्प्लेक्समध्ये तेजी आणि चीन, अमेरिका आणि यूरोपिय देशांमध्ये औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठं अंतर निर्माण झालं आहे. रिलिगेअर कमोडिटीज लिमिटेड (RCL) च्या सुगंधा सचदेव यांचं असं म्हणणं आहे की, मीडियम टर्ममध्ये चांदीचे दर 75,500-76,000 रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहोचू शकतात. तर दीर्घ कालावधीसाठी किंवा 2021 च्या अखेरपर्यंत दर 85,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे तुम्ही जर आता गुंतवणूक करून दर वाढल्यानंतर विक्री करण्याचं ठरवल्यास तुम्हाला चांगला नफा कमावता येईल. सोन्याचे दर 52,000 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचू शकतात. दीर्घ कालावधीसाठी दर 60 हजार प्रति तोळा या स्तरावर देखील पोहोचू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या