JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: या आठवड्यात दुसऱ्यांदा उतरले भाव, वाचा काय आहेत बुधवारचे दर

Gold Price Today: या आठवड्यात दुसऱ्यांदा उतरले भाव, वाचा काय आहेत बुधवारचे दर

Gold and Silver Price Today: देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. तर चांदीचे भाव देखील 933 रुपये प्रति किलाने कमी झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 डिसेंबर: भारतीय  बाजारात आज पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात 23 डिसेंबर 2020 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति तोळा 252 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात 900 पेक्षा अधिक दराने घसरण झाली आहे. एक किलो चांदीच्या किंमतीत आज (Silver Rates Today) 933 रुपयांची घसरण  झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सोन्याचे दर 49,758 रुपये प्रति तोळावर ट्रेड करणं बंद झालं होतं, तर चांदी  67,429 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढले आहेत तर चांदीच्या किंमती स्थीर आहेत. असे असले तरी देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याचे आजचे भाव (Gold Price on 23nd December 2020) दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर 252 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. यानंतर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 49,506 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर 49,758 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर किरकोळ स्वरुपात वाढले आहेत. या वाढीनंतर 1,868 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा- ‘या’ प्रसिद्ध कंपनीच्या शेअर धारकांना कमाईचा गोल्डन चान्स,11 जानेवारीपर्यंत संधी ) चांदीचे आजचे भाव (Silver Price on 23nd December 2020) सोन्याप्रमाणेच बुधवारी चांदीमध्येही घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी चांदीच्या दरांत 933 रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 66,493 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात  (International Market)चांदीचे भाव  25.53 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते (हे वाचा- YouTube वर सर्वाधिक कमाई करणारे TOP10 युट्यूबर्स, किंमत वाचून व्हाल थक्क ) का कमी झाले सोन्याचांंदीचे दर? मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस (Motilal Oswal Financial Services) चे व्हाइस प्रेसिडेंट (कमोडिटीज) नवनीत दमानी यांच्या मते, सोन्याचे दर आधीच खूप वाढले आहेत. अमेरिकेत प्रोत्साहन पॅकेजला मिळालेल्या मंजुरीनंतर अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशावेळी गुंतवणुकदारांनी सोन्यातील खरेदी कमी केली आहे. दरम्यान ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनने गुंतवणुकदारांची चिंता वाढवली आहे. अधिकतर देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या जाणाऱ्या विमानसेवेवर बंदी आणली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, जी ही भीती आणि चिंता वाढली तर सोन्याचांदीचे दरही भविष्यात आणखी वाढू  शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या