JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा 49000 रुपयांपेक्षा जास्त, चांदीलाही झळाळी

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा 49000 रुपयांपेक्षा जास्त, चांदीलाही झळाळी

Gold Prices Today: कोरोना व्हायरस लशीबाबत येणाऱ्या सकारात्मक बातम्या त्याचप्रमाणे कमजोर डॉलर यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभरात सोन्याचे दर कमी झाले असले तरीही आज दरात वाढ पाहायला मिळाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर आज वाढले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत  बाजारातील सोन्याच्या किंमतीवर होत आहे. गुरुवारी सकाळच्या सत्रात वायदे बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. मल्टी कमोडिटी  एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गुरुवारी कमजोर अमेरिकन डॉलर (US Dollar) आणि अमेरिकेतील  स्टिम्यूलस पॅकेज संदर्भात वाढलेल्या अपेक्षा यामुळे सोन्याच्या किंमतीवर असा परिणाम पाहायला मिळाला. सोन्याचांदीला झळाळी आज सकाळी 10 वाजता MCX वर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीचे सोन्याचे दर 0.56 टक्क्यांनी वाढून 49,220 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत, याआधी काही वेळापूर्वी दर  48,947 प्रति तोळा होते, तर बाजार उघडताना सोन्याच्या दराची सुरुवात  49,147 रुपये प्रति तोळापासून झाली होती. सोन्याबरोबर आज चांदीही महागली आहे. चांदीचे 0.57 टक्क्यांनी वाढून  63,685 रुपये प्रति तोळा झाले आहेत. बाजार उघडताना चांदीचे दर  63,638 रुपये प्रति किलो होते. अमेरिकीन वायदे बाजारात सोन्याचे दर 0.46 टक्क्यांनी वाढून 1,838.65 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. (हे वाचा- LPG Cylinder Price: सामान्यांच्या खिशाला चाप, आजपासून महागला घरगुती गॅस सिलेंडर ) केडिया कमोडिटी कॉमट्रे़डचे डिरेक्टर अजय केडिया (Ajay Kedia, director, Kedia Commodity Comtrade) यांच्या मते, ‘सोन्याच्या किंमतीत तांत्रिकदृष्ट्या ओव्हरसोल्ड  क्षेत्रामध्ये कमी कव्हरिंग पाहायला मिळते आहे. अमेरिकेत वाढत्या संक्रमणाची चिंता, डॉलरची कमजोरी आणि प्रोत्साहन पॅकेज बाबतच्या आशा या सर्व गोष्टी सोन्याच्या किंमतींना पाठिंबा देत आहेत.’ (हे वाचा- बदलला बँक खात्यातून पैसे काढण्याचा नियम, कोट्यवधी ग्राहंकावर होणार थेट परिणाम ) फेडरल रिझर्व्ह चेअर जेरोम पॉवेल (Jerome Powell) आणि अमेरिकन ट्रेझरी सेक्रेटरी स्टीव्हन न्यूचीन (Steven Mnuchin) या दोघांनी पँडेमिकच्या पुढच्या काही महिन्यांत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वित्तीय प्रोत्साहनाला पाठिंबा दिला आहे. सिनेटमध्ये पॉवेल यांनी असे सूचित केले की केंद्रीय बँकेच्या आर्थिक आधाराव्यतिरिक्त आणखी वित्तीय उत्तेजनाची आवश्यकता असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या