PNB ने एक ट्वीट केले आहे, त्यानुसार- 1 डिसेंबरपासून रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत PNB 2.0 ATM मधून एकाच वेळी 10000 रुपयापेक्षा जास्त रक्कम काढण्याची प्रक्रिया ओटीपी बेस्ड असेल. अर्थात नाइट आवर्समध्ये 10000 रुपयापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर PNB ग्राहकाना OTP आवश्यक असेल. त्यामुळे या वेळेत ATM मध्ये जाताना तुमचा मोबाइल बरोबर घेऊनच जा.
कशी काम करेल ही प्रणाली?- 1. PNB एटीएममधून पैसे काढण्यासाठी बँक तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवेल. 2. हा OTP केवळ एकाच transaction साठी लागू होईल. 3. या नवीन प्रणालीमधून पैसे काढण्यामुळे सध्याच्या कोणत्याही प्रक्रियेवर परिणाम होणार नाही. 4. बँकेचे असे म्हणणे आहे की, यामुळे बनावट कार्डमुळे होणारे अवैध व्यवहार रोखले जातील.