JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी, 2 आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले दर

Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी, 2 आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले दर

Gold price Today: एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे दर 0.3 टक्क्यांनी वाढून दोन आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. या वाढीनंतर दर 47,445 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 जुलै: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये  (Gold price today) आज तेजी पाहायला मिळते आहे.  एमसीएक्सवर (MCX Multi Commodity Exchange) सोन्याचे दर 0.3 टक्क्यांनी वाढून दोन आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. या वाढीनंतर दर 47,445 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 0.3 टक्क्याने वाढून 70254 रुपये प्रति किलो झाली आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.11 टक्क्यांनी वाढले होते, तर चांदी 0.18 टक्क्यांनी घसरली होती. आज सोन्यामध्ये वाढ झाली असलती तरीही ऑल टाइम हाय अर्थात सर्वोच्च स्तरापेक्षा सोन्याचे दर 9000 रुपयांनी कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये (Gold Rates in August 2020) सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. यावेळी सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळाच्या आसपास होते. आतापर्यंत सोनं पुन्हा या रेकॉर्ड स्तरावर पोहोचलं नाही आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी सोन्यामध्ये तेजी पाहायला मिळते आहे. अमेरिकेत सोन्याचे दर 7.33 डॉलरच्या तेजीनंतर 1,798.73 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 0.14 डॉलरच्या तेजीमुळे 26.57 डॉलरच्या स्तरावर पोहोचले आहेत. हे वाचा- 1 ऑगस्टपासून बदलणार या मोठ्या खाजगी बँकेचे नियम, तुमचं खातं असल्यास जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 50510 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईमध्ये दर 47440 रुपये आहेत. याशिवाय चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरूमध्ये सोन्याचे दर अनुक्रमे 48980 रुपये, 49620 रुपये आणि 48480 रुपये प्रति तोळा आहेत. का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, डॉलरमध्ये आलेल्या कमजोरीमुळे गुंकवणूकदारांनी सोनंखरेदी केली आहे. यामुळे सोन्याच्या किंमतींना सपोर्ट मिळाला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटी रिसर्च नवनीत दमानी यांनी असे म्हटले आहे की, डॉलरमध्ये घसरण आणि कोव्हिड-19 च्या नवीन व्हॅरिएंटबाबत वाढलेल्या भीतीमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. हे वाचा- तुम्ही एखादं App अशाप्रकारे डाउनलोड करत असाल तर सावधान, SBI ने दिला इशारा तज्ज्ञांचा सल्ला जाणकारांच्या मते, या वर्षाच्या शेवटी सोन्याचे दर सर्व रेकॉर्ड तोडून 60 हजार रुपये प्रति तोळाच्या स्तरावर पोहोचू शकतात. अशावेळी गुंतवणूकदारांनी सहा महिन्याच्या अवधीत खरेदी केल्यास त्यांना नफा होऊ शकतो. गेल्या वर्षी सोन्याने 28 टक्के परतावा दिला आहे. त्या आधीच्या वर्षीही सोन्याने दिलेला परतावा सुमारे 25 टक्के होता. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल तर सध्या सोनं गुंतवणूकीसाठी एक अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे, जो चांगला परतावा देईल. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत वाढेल, म्हणून तुमच्यासाठी ही चांगली गुंतवणूक संधी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या