नवी दिल्ली, 27 जुलै: भारतीय बाजारात आज 27 जुलै रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) कमी झाले आहेत. या घसरणीनंतर सोनं 46,500 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर आज चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rates) 46,628 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचे दर (Silver Price) 65,916 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील आज सोन्याचे दर कमी झाले आहेत, तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. सोन्याचे नवे दर (Gold Rates on 27th July 2021) दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर मंगळवारी 123 रुपयांनी कमी झाले आहेत. यानंतर दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,505 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,800 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. हे वाचा- आजच पूर्ण करा बँकिंगसंंबंधित ही कामं, ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका चांदीचे नवे दर (Silver Rates on 27th July 2021) चांदीच्या किंमतीतही आज घसरण पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीचे दर 206 रुपयांनी कमी झाले आहेत. यानंतर चांदीचे दर 65,710 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतीत विशेष बदल झालेला नाही, याठिकाणी चांदीचे दर 25.16 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. हे वाचा- HDFC देत आहे 10 लाख रुपयांची कॅश, द्यावं लागेल 6 महिन्यांचं बँक स्टेटमेंट का कमी झाले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढता असल्याने किंमतींमध्ये चढउतार जारी आहे. यामुळे गुंतवणूकदार अधिक सतर्क आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिेसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्चचे नवनीत दमानी यांनी असे म्हटले आहे की अमेरिकन गुंतवणूकदार फेडरल रिझर्व्हच्या होणाऱ्या मीटिंगमधील निर्णयांकडे लक्ष ठेवून आहेत.