Gold Rates Today
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: सोन्याचे दर (Gold Price Today) आज भारतीय बाजारात कमी झाले आहेत. फेड रेटच्या निर्णयाआधी भारतीय बाजारात आज सोन्याच्या दरात (Gold price) आज घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold price on MCX) सोन्याचे दर आज 46,633 रुपये प्रति तोळावर ट्रड करत आहे. तर सप्टेंबरच्या चांदीचा वायदा (Silver price today) दर 0.71 टक्क्यानी वाढून 60,870 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 0.7 टक्क्यानी तर चांदीचा दर 1.2 टक्क्यानी वाढला होत. दरम्यान गल्यावर्षी सोन्याचा दर 56,000 रुपये प्रति तोळावर पोहोचला होता. त्यानुसार आता सोन्याचा दर जवळपास 10000 रुपयानी स्वस्त आहे. काय आहे तुमच्या शहरातील सोन्याचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते आज बुधवारी सोन्याचा दर (24 कॅरेट) सोन्याचा दर 46,330 रुपये प्रति तोळावर आहे. मंगळवारच्या दराच्या तुलनेत आज चांदीचा दर 200 रुपयांनी कमी झाला आहे. यामुळे चांदी आज 59,800 रुपये प्रति किलोग्राम या दराने विकली जात आहे. नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 45,650 रुपये आणि 45,330 रुपये प्रति तोळा आहे. हे वाचा- SBI Alert! या फेक कस्टमर केअर क्रमांकावरुन फोन आला असेल तर वेळीच व्हा सावधान वेबसाइटच्या मते, चेन्नईमध्ये सोन्याचे दर 43,740 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 49,800 रुपये प्रति तोळा आणि मुंबईमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,330 रुपये प्रति तोळा आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.