नवी दिल्ली, 28 जुलै: भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 28 जुलै रोजी (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीचे दरही (Silver Price Today) 1000 रुपयांपेक्षा अधिक फरकाने कमी झाले आहेत. यामुळे चांदी 65000 रुपयांपेक्षा कमी झाली आहे. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rates) 46,668 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीचे दर (Silver Rates) 65,873 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीच्या किंमतीत किरकोळ तेजी पाहायला मिळाली आहे. सोन्याचे नवे दर (Gold Price on 28th July 2021) दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज 61 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,607 रुपये प्रति तोळा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किरकोळ वाढ होऊन दर 1,800 डॉलर प्रति औंस झाले आहेत. फॉरेक्समध्ये आज रुपया डॉलरच्या तुलनेत 4 पैशांच्या मजबुतीनंतर 74.43 च्या स्तरावर ट्रेड करत आहे. हे वाचा- ऑनलाइन बँकिंगमध्ये असुरक्षिततेचा धोका? SBIने Yono Lite App जोडलं महत्त्वाचं फीचर चांदीचे नवे दर (Silver Price on 28th July 2021) चांदीच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदी 1,094 रुपयांनी उतरली आहे. या घसरणीमुळे चांदीचे दर 64,779 रुपये प्रति किलो झाले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातही आज चांदीचे दर वधारले आहेत. या वाढीनंतर चांदी 24.76 डॉलर प्रति औंस झाली आहे. हे वाचा- ‘या’ बँकेला RBI ने ठोठावला 1 लाख रुपयांचा दंड, वाचा काय आहे कारण का कमी झाले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते रुपयामध्ये आलेली मजबुती आणि कमोडिटी एक्सचेंजवर किंमती कमी झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटीज रिसर्च नवनीत दमानी यांच्या मते, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत सोन्याच्या किंमतीत चढउतार होत आहे.