मुंबई, 11 नोव्हेंबर: सोन्याच्या किंमतीत (Gold price today) आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price Today on MCX) वाढ पाहायला मिळाली. गुरुवारी 11 नोव्हेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर (Gold price) 0.33%ने वाढला आहे. अर्थात सोन्याचे दर 163 रुपयांनी वधारले आहेत. यासह प्रति तोळा सोन्याचा भाव 49,017 रुपयांवर आहे. तर चांदीचा भाव 175 रुपयांनी वाढून अर्थात 0.27 टक्क्यांच्या तेजीसह 66053 रुपये प्रति तोळा झाला आहे. सोने विक्रमी पातळीपेक्षा 1000 रुपयांनी स्वस्त आहे गेल्या वर्षी 11 नोव्हेंबर रोजी MCX वर सोन्याचा भाव प्रति तोळा ₹50,259 वर होता. तर चांदीचा भाव 62,097 रुपयांवर व्यवहार करत होता. आज सोन्याचा दर 49,017 रुपयांवर आहे. त्यानुसार सध्या सोने केवळ 1000 रुपयांनी स्वस्त मिळते आहे. चांदी आज 66053 रुपयांवर असल्याने चांदी आज सुमारे चार हजार रुपयांनी महागली आहे. आता लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत सोन्या-चांदीचे वाढलेले दर सर्वसामान्यांसाठी अडचणीचे ठरू शकते. हे वाचा- PF वर किती मिळेल व्याज? या दिवशी EPFO च्या बैठकीत होणार निर्णय; वाचा सविस्तर मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. हे वाचा- पुढील आठवड्यात आहे कमाईची संधी, या IPOमध्ये किती रुपयांत कराल गुंतवणूक? अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.