नवी दिल्ली, 07 एप्रिल: भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) कमीच होत आहेत. आज 07 सप्टेंबर रोजी देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीची झळाळी देखील (Silver Price Today) आज उतरली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आधीच्या सत्रात सोन्याचे दर 46,454 रुपये प्रति तोळा होते, तर चांदीचे दर 63,944 रुपये प्रति किलोवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी झाले असून चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. सोन्याचे नवे दर दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी केवळ 37 रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,417 रुपये प्रति तोळा झाले आहेत. सोन्याच्या सर्वोच्च दराच्या तुलनेत हा दर 9,783 रुपये प्रति तोळाने कमी आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. त्यामुळे सोन्याचे दर एवढ्या मोठ्या फरकाने कमी झालेले असताना आता तुमच्याकडे गुंतवणुकीची संधी आहे. कारण तज्ज्ञांच्या मते यावर्षी सोन्याचे दर 60 हजार रुपये प्रति तोळाचा स्तर गाठू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर कमी होऊन 1,815 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. हे वाचा- दरवर्षी 6000 रुपये हवे असतील तर लक्षात घ्या या गोष्टी! अजिबात करू नका या चुका चांदीचे नवे दर चांदीचे दर देखील आज कमी झाले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीच्या दरात 332 रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर चांदीचे दर 63,612 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. यानंतर चांदीचे दर 24.50 डॉलर प्रति औंस झाले आहेत. हे वाचा- इंधन दरामुळे सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव का उतरले दर? एचडीएफसी सिक्योरिटीज (HDFC Securities) चे सीनिअर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, डॉलरमध्ये मजबुती आल्याने सोन्याचे दर कमी झाले आहेत. न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर कमी झाल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारांवर होत आहे. तज्ज्ञांच्या मते डॉलरमध्ये सुधारणा झाल्यावर सोन्यात नफावसूली होत आहे. परिणामी सोन्याचे दर कमी झाले आहेत.