Home /News /money /

PM Kisan: दरवर्षी 6000 रुपये हवे असतील तर लक्षात घ्या या गोष्टी! अजिबात करू नका या चुका

PM Kisan: दरवर्षी 6000 रुपये हवे असतील तर लक्षात घ्या या गोष्टी! अजिबात करू नका या चुका

PM Kisan: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. यापैकी एक महत्त्वाची योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही आहे.

    नवी दिल्ली, 07 सप्टेंबर: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. यापैकी एक महत्त्वाची योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (PM kisan Samman Nidhi Scheme) ही आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षाला 6000 रुपये पाठवण्यात येतात. 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे पाठवले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने (PM Kisan Installment) शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. दरम्यान काही शेतकऱ्यांचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये (Farmers beneficiary list) आहे मात्र त्यांना या योजनेचा फायदा मात्र अद्याप मिळालेला नाही. शेतकरी करतात या चुका शेतकऱ्यांनी अर्ज करूनही त्यांना या योजनेचे 2000 रुपये मिळत नाही. कारण योजनेच्या अटीनुसार त्यांनी याकरता अर्ज भरलेला नसतो. योजनेच्या अर्जामध्ये तुमचं नाव ENGLISH मध्ये असणं आवश्यक आहे. अशावेळी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरताना त्यांचे नाव मराठीत किंवा अन्य भाषेत लिहिलं आहे त्यांनी यामध्ये सुधारणा करून घ्यावी. जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. अर्जात केवळ इंग्रजी अल्फाबेटमध्ये नाव प्रविष्ट करता येतं. हे वाचा-Gold price today: पुन्हा स्वस्त झालं सोनं, चांदीचीही झळाळी उतरली; इथे तपासा भाव याशिवाय पीएम किसानच्या योजना अर्जावरील नाव आणि तुमच्या ज्या खात्यात पैसे येणार आहेत त्यामधील नाव वेगवेगळं असल्यास हे पैसे अडकू शकतात. अशावेळी शेतकऱ्यांनी त्यांचे नाव आधारवरील नावाप्रमाणे बँक खातं आणि अर्जामध्ये नमुद करणं आवश्यक आहे. याशिवाय बँक अकाउंट क्रमांक, आयएफएससी कोड आणि गावाचे नाव योग्य पद्धतीने लिहा. अशाप्रकारे ऑनलाइन सुधारा तुमच्या चुका >>सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल. त्याठिकाणी फार्मर्स कॉर्नरवर जाऊन क्लिक करा. >> त्याठिकाणी आधार एडिटची एक लिंक दिसेल, त्याठिकाणी Edit Aadhaar Details तुम्हाला क्लिक करावं लागेल. >> त्यानंतर जे पेज ओपन होईल त्याठिकाणी तुम्ही आधार क्रमांक दुरुस्त करू शकता >> तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करावं लागेल >> नावात चूक असेल तर ती देखील ऑनलाइन तपासू शकता. हे वाचा-इंधन दरामुळे सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव >> खातेक्रमांक चुकीचा असेल तर तो देखील सुधारू शकता >> शिवाय तुम्ही कृषी विभाग कार्यालय किंवा लेखापाल यांच्याशी देखील संपर्क करू शकता. >> Helpdesk ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंतर ज्या काही चुका आहेत त्या सुधारू शकता. तक्रारीसाठी या क्रमांकावर करा संपर्क पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर 011-24300606 / 011-23381092 यावर संपर्क करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल (Email) pmkisan-ict@gov.in यावर देखील संपर्क करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: PM Kisan, PM narendra modi

    पुढील बातम्या