JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Rate Today- आज सोन्याचांदीच्या किंमतीत वाढ, इथे वाचा गुरुवारचे नवे दर

Gold Rate Today- आज सोन्याचांदीच्या किंमतीत वाढ, इथे वाचा गुरुवारचे नवे दर

Gold Price on 8th October: गुरुवारी सोन्याचांदीचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 82 रुपयांनी वाढले आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 82 रुपयांनी वाढले आहेत तर चांदी प्रति किलो 1074 रुपयांनी महागली आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (US President Donald Trump) यांनी आर्थिक पॅकेज संदर्भात केलेल्या ट्वीटनंतर सोन्याच्या दरात काहीशी तेजी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरावर पोहोचून आता 50000 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. येणाऱ्या काही दिवसात किंमती अशाच राहण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण किंवा मोठी वाढ पाहायला मिळणार नाही. दिवाळीमध्ये देखील सोन्याचे दर  50000-52000 रुपये प्रति तोळाच्या आसपास असतील. सोन्याचे आजचे दर (Gold Price on 8th October 2020) एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति तोळा 82 रुपयांनी वाढले आहेत.  यानंतर सोन्याचे भाव 51,153 रुपये प्रति तोळा झाले आहेत. बुधवारी दिल्लीत या शुद्धतेच्या सोन्याचा भाव 51,071 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव उतरते आहेत. याठिकाणी दर 1891 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत चांदीचे आजचे दर (Silver Price on 8th October 2020) आजही चांदीचे दर वधारले आहेत. गुरुवारी चांदीचे भाव 1074 रुपये प्रति किलोने वाढून 62,159 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचले आहेत. बुधवारी चांदीचे दर 61,085 रुपये प्रति किलोग्राम पर्यंत गेले होते. आता पुढे काय होणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्थिक पॅकेज बाबत एक ट्वीट करत यावर स्वाक्षरी करण्याबाबत भाष्य केले आहे. यानंतर जगभरातील शेअर बाजारात तेजी आली आहे. कारण अमेरिका जगभरातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. (हे वाचा- या शहरात बनतंय भारतातील सर्वात मोठं एअरपोर्ट, होणार 29560 कोटी खर्च) (हे वाचा- रोज केवळ 28 रुपये खर्च करून मिळतील 6 फायदे, उपयोगाची आहे LIC ची ही योजना) त्याठिकाणी आर्थिक बाबी सुधारल्यास संपूर्ण जगासाठी ते फायदेशीर आहे. या दरम्यान सोन्यामध्ये गुंतवणूक कमी झाली आहे. अर्थव्यवस्था जेव्हा मंदावते तेव्हा सोन्याचे दर वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी सरकारकडून कोणतेही पावलं उचलली गेली तर त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होतो. अशावेळी सोन्याचे दर कमी होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या