JOIN US
मराठी बातम्या / मनी / IRCTC तिकिट बुकिंग प्रणालीत होणार बदल, प्रक्रिया जलद करण्याचा रेल्वेचा मानस

IRCTC तिकिट बुकिंग प्रणालीत होणार बदल, प्रक्रिया जलद करण्याचा रेल्वेचा मानस

रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railway) प्रवाशांसाठी रेल्वेच्या ई-तिकिटची सेवा देणाऱ्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची वेबसाइट आणि अ‍ॅप लवकरच अपग्रेड होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 डिसेंबर: रेल्वे मंत्रालयाकडून (Ministry of Railway) प्रवाशांसाठी रेल्वेच्या ई-तिकिटची सेवा देणाऱ्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची वेबसाइट आणि अ‍ॅप लवकरच अपग्रेड होणार आहे. प्रवाशांना सहजरित्या तिकिट बुक करता यावे, याकरता काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय  मंत्री पीयूष गोयल (Union Minister Piyush Goyal ) यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली की, IRCTC च्या वेबसाइट आणि अ‍ॅप वर प्रवाशांना तिकिट बुक करण्यासाठी सर्व सुविधा सहजरित्या प्राप्त होतील. ही प्रक्रिया थेट असणार असून जलद गतीने मध्ये ग्राहक तिकिट बुक करू शकतील. भारतीय रेल्वेने (Indian Railway) अधिकृत निवेदनात असं म्हटलं आहे की, भारतीय रेल्वे त्यांच्या ई-तिकिट वेबसाइटमध्ये युजर पर्सनलायझेशन आणि फॅसिलिटी वाढवण्यावर काम करत आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे. आयआरसीटीसी वेबसाइट अपग्रेड करण्यासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतल्यानंतर पीयूष गोयल यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की 2014 सालापासून, तिकिट बुकिंगचा अनुभव सुधारण्यासाठी तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांच्या योग्य सोयी उपलब्ध व्हाव्यात यावर जोर देण्यात येत आहे. (हे वाचा- महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना RBI ने केला रद्द, ठेवीदारांवर काय होणार परिणाम? ) या प्रसिद्धी पत्रकात असं म्हटलं आहे की रेल्वे मंत्रालयाचा असा विश्वास आहे की आयआरसीटीसी वेबसाइट रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी पहिला संपर्क बिंदू आहे आणि हा अनुभव चांगला आणि सोयीस्कर असावा. वेगवान पद्धतीने करता येईल तिकिट बुकिंग यामध्ये असे म्हटले आहे की नवीन डिजिटल इंडिया अंतर्गत, जास्तीत जास्त लोक तिकिट आरक्षण काउंटरवर जाण्याऐवजी रेल्वेच्या तिकिटांसाठी ऑनलाईन तिकीट बुक करत आहेत. (हे वाचा- दरमहा 42 रुपये गुंतवून मिळवा आयुष्यभर पेन्शन, या सरकारी योजनेचा अनेकांना फायदा) म्हणूनच आयआरसीटीसीने वेबसाइट आणि अ‍ॅप सातत्याने अपग्रेड करण्याचे प्रयत्न दुप्पट करण्याची गरज आहे. रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे की आयआरसीटीसी वेबसाइट आणि अ‍ॅप अपग्रेड झाल्यानंतर प्रवाशांना पूर्वीपेक्षा जास्त त्वरित तिकीट काढता येणार आहे आणि जास्त कोणत्याही त्रासाशिवाय तिकिट बुकिंग करता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या