JOIN US
मराठी बातम्या / मनी / FDमध्ये पैसे गुंतवायचा विचार करताय? मग RBIनं बदललेला हा नियम आजच घ्या समजून, नाहीतर...

FDमध्ये पैसे गुंतवायचा विचार करताय? मग RBIनं बदललेला हा नियम आजच घ्या समजून, नाहीतर...

FD Rules Changed: आरबीआयने एफडीबाबतचे नियम बदलले आहेत. या बदलानंतर, जर तुमची एफडी मॅच्युरिटीनंतरही क्लेम केली नाही आणि पैसे बँकेतच राहिले तर तुम्हाला एफडीवरील व्याजाचं नुकसान सहन करावं लागू शकतं. चला जाणून घेऊया अपडेट.

जाहिरात

FDमध्ये पैसे गुंतवायचा विचार करताय? मग RBIनं बदललेला हा नियम आजच घ्या समजून

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 नोव्हेंबर: तुम्हीही फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेनं एफडीच्या नियमात मोठा बदल केला आहे. रिझर्व्ह बँकेनं काही काळापूर्वी एफडीशी संबंधित नियम बदलले होते. आता हे नवे नियम लागू झाले आहेत. आरबीआयच्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर अनेक सरकारी आणि गैर-सरकारी बँकांनीही एफडीवरील व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एफडी करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. एफडीच्या मॅच्युरिटीचे नियम बदलले- वास्तविक, आरबीआयने फिक्स्ड डिपॉझिच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. आता मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही रकमेवर दावा केला नाही तर तुम्हाला त्यावर कमी व्याज मिळेल. हे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल. सध्या बँका सामान्यतः 5 ते 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीच्या FD वर 5 टक्केपेक्षा जास्त व्याज देतात. तर बचत खात्यावरील व्याजदर सुमारे 3 ते 4 टक्के आहेत. आरबीआयनं जारी केला हा आदेश- आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, जर फिक्स्ड डिपॉझिटचा मॅच्युरिटी पीरियड संपला असेल आणि रक्कम काढली गेली नाही, तर बचत खात्यानुसार त्यावरील व्याज दर किंवा परिपक्व झालेल्या एफडीवर निश्चित केलेला व्याजदर, यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल. सर्व व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवींवर हे नवीन नियम लागू होतील. हेही वाचा:  ‘या’ दोन बँकांचा ग्राहकांना दणका! कर्ज झालं महाग, चेक करा नवे व्याजदर नियम काय सांगतो? समजा तुमच्याकडे 5 वर्षांची मॅच्युरिटी असलेली एफडी आहे, जी आज मॅच्युअर झाली आहे, परंतु तुम्ही हे पैसे काढत नाही, तर यावर दोन परिस्थिती असतील. जर FD वर मिळणारे व्याज त्या बँकेच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा कमी असेल तर तुम्हाला FD सोबत व्याज मिळत राहील. जर एफडीवर मिळणारे व्याज बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला मुदतपूर्तीनंतर बचत खात्यावर व्याज मिळेल.

जुना नियम काय होता? पूर्वी, जेव्हा तुमची FD परिपक्व झाली आणि तुम्ही ती काढली नाही किंवा दावा केला नाही, तर बँक तुमची FD त्याच कालावधीसाठी वाढवत असे ज्यासाठी तुम्ही आधी FD केली होती. पण आता तसे होणार नाही. पण आता मुदतपूर्तीवर पैसे काढले नाहीत तर एफडीवर व्याज मिळणार नाही. त्यामुळे मॅच्युरिटीनंतर लगेच पैसे काढायला हवेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या