नवी दिल्ली, 12 जानेवारी: टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) कंपनीचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते, पण एका आठवड्याच्या आतच त्यांना मिळालेला मान हिसकावून घेण्यात आला आहे. आता ते जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. एलॉन मस्क यांनी Amazon चे संस्थापक जेफ बेजोस यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान मिळवला होता. मात्र आठवड्यापेक्षाही कमी कालावधीत ते दुसऱ्या स्थानावर आले आहेत आणि विशेष म्हणजे जेफ बेजोस (Jeff Bezos) यांनीच त्यांना मागे टाकलं आहे. फोर्ब्झ मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. एकाच दिवसात त्यांच्या संपत्तीमध्ये 14 अब्ज डॉलर्सची घसरण झाली, परिणामी ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर ढकलले गेले आहेत. (हे वाचा- हा व्यवसाय करेल तुम्हाला मालामाल; केवळ 20 हजार गुंतवून मिळवा 3.5 लाख ) नेटवर्थमध्ये 8 टक्क्यांची घसरण सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे मस्क यांची नेटवर्थ 176.2 अब्ज अमेरिकी डॉलर झाली आहे. मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने यावर्षी मार्केट व्हॅल्यूमध्ये चांगलीच वाढ केली आहे. गेल्या आठवड्यात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी उसळी आली होती. ज्यानंतर कंपनी संपत्तीच्या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचली होती. मस्क यांची एकूण संपत्ती 185 बिलियन डॉलर्सच्या पलीकडे पोहोचली होती. (हे वाचा- Gold Price Today: आज पुन्हा स्वस्त झालं सोनं, इथे तपासा लेटेस्ट दर ) जेफ बेजोस 2017 सालापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ते पहिल्या स्थानावर होते. मस्क यांनी त्यांना पिछाडीवर टाकत पहिलं स्थान पटकावलं होतं. एलॉन मस्क आता बेजोस यांच्या 6 अब्ज डॉलर मागे आहेत. जेफ बेजोस यांची नेटवर्थ 182.1 अब्ज डॉलर झाली आहे. सोमवारी Amazon च्या शेअर्समध्ये देखील घसरण झाली होती. या घसरणीनतंर त्यांची नेटवर्थ 3.6 अब्ज डॉलरने कमी झाली होती, तरी देखील त्यांनी मस्क यांना मागेे टाकले आहे.