JOIN US
मराठी बातम्या / मनी / तुम्हाला मिळणाऱ्या 'बोनस'ची सुरुवात नक्की कशी झाली?

तुम्हाला मिळणाऱ्या 'बोनस'ची सुरुवात नक्की कशी झाली?

तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात. बोनस म्हणजे बऱ्याचदा कंपनीकडून मिळालेलं गिफ्ट अशी संकल्पना किंवा तुमची धारणा असेल तर हे वाचल्यावर ती दूर होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : बऱ्याच कंपन्यांमध्ये दिवाळी चा बोनस मिळतो. बोनस मिळणार याचा आनंद असतोच पण आलेला बोनस कधी संपतो याचाही पत्ता लागत नाही. बोनस मिळणार याची मजा काही वेगळीच असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? बोनस ही संकल्पना नक्की कशी आली सगळ्यात पहिल्यांदा कुणी बोनस दिला असावा? नेमकी ही कल्पना आली कुठून? कंपनी तुम्हाला किती बोनस देऊ शकते? तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात. बोनस म्हणजे बऱ्याचदा कंपनीकडून मिळालेलं गिफ्ट अशी संकल्पना किंवा तुमची धारणा असेल तर हे वाचल्यावर ती दूर होईल. कारण हा पगार एक अर्थाने तुमच्याच घामातून वजा केलेला असतो. तुमच्या हक्काचा असतो. बोनस ही संकल्पना पहिल्यांदा ब्रिटिशांनी आणली. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. भारतातच नाही तर बऱ्याच देशांमध्ये त्यांनी बोनस सुरू केला. त्यामागे खरं तर कामगारांचा फायदा नाही तर त्यावेळी त्यांचा फायदा त्यांनी पाहिला. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पूर्वी कामगारांना आठवड्यानुसार त्यांच्या कामाचा मोबदला दिला जात होता. यामध्ये ब्रिटिशांचे जास्त पैसे जात असल्याचं लक्षात आलं म्हणून त्यांनी कामाचा मोबदला देण्याची पद्धत बदलली.

PM kisan Yojana : तुमच्या खात्यावर पोहोचले नाहीत 2 हजार तर या नंबरवर करा कॉल

 जर आठवड्या ऐवजी कामाचा मोबदला म्हणजे आता आपण त्याला पगार म्हणतो तो महिन्याअखेरीस आला तर त्यांचे पैसे जास्त वाचतील असा त्यावेळी ग्रह होता. त्यामुळे कामगारांना 52 आठवड्यांऐवजी 48 आठवड्यांचाच पगार मिळायला लागला.

4 आठवडे आहेत तर 52 आठवड्यांच्या हिशोबानं 13 महिन्यांचा पगार काम करणाऱ्याला मिळायला हवा. मात्र आता महिन्याला पगार ही पद्धत आणल्यामुळे 12 महिन्यांचाच पगार मिळतो. म्हणजे एका महिन्याचा पगार हा कंपनीचा नफा उरतो. जेव्हा हे सगळं कामगारांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आंदोलन केलं, खूप गोंधळही झाला. यावर ब्रिटिशांनी तोडगा काढला, तो असा की 13 वा पगार कामगरांना मोठ्या सणाला मिळेल. काळानुसार या गोष्टी बदलत गेल्या आणि त्याला बोनस हे स्वरुप आलं. हा बोनस टॅक्सेबल असतो बरं का, त्यावर 30 टक्क्यांपर्यंत टॅक्सही लागू होतो.

वाद टाळण्यासाठी भाडेकरू-घरमालकाने कोणती खबरदारी घ्यावी? या नवीन कायद्यात दोघांना अधिकार

संबंधित बातम्या

पहिल्या महायुद्धाच्या वेळी कामगारांना 10 टक्के बोनस देण्यात आल्याच्याही काही ठिकाणी नोंदी सापडतात. त्यामुळे ही संकल्पना तेव्हापासूनच कमी अधिक प्रमाणात सुरू असावी. त्यामागचा उद्देश कामगार किंवा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याकडून अधिक चांगलं काम कसं होईल हे पाहाणं हा आहे.

आता प्रत्येक कंपनी पगाराच्या स्केलनुसार कोणाला किती बोनस द्यायचा हे देखील ठरवून घेते. काही कंपन्या ज्यांचे पगार कमी त्यांनाच बोनस देतात. 1965 मध्ये याबाबत कायदा करण्यात आला. त्यासाठी काही नियम आणि अटी देखील ठेवण्यात आल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या