JOIN US
मराठी बातम्या / मनी / Diwali 2022 : कार-बाईक घेण्याआधी 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान

Diwali 2022 : कार-बाईक घेण्याआधी 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान

सेकंड हॅण्ड किंवा नवी कोरी बाईक तुम्ही घेण्याचं या दिवाळीत स्वप्न पाहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : आपल्याकडे कार किंवा बाईक असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशावेळी सेकंड हॅण्ड किंवा नवी कोरी बाईक तुम्ही घेण्याचं या दिवाळीत स्वप्न पाहात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कार किंवा बाईक खरेदी करण्याआधी तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आजकाल लोक घाईघाईत आणि एजंटच्या गोड बोलण्यात बसतात आणि गडबडीत कार किंवा बाईक घेतात. त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतच पण कार किंवा बाईकची नीट माहितीही न काढता घेतल्यामुळे नुकसान होऊ शकतं. क्रेडिट स्कोअर क्रेडिट स्कोअरचे महत्त्व तुम्हाला माहीतच असले पाहिजे, हा स्कोअर जितका जास्त तितकं तुम्हाला कर्ज मिळवणं सोयीचं होतं. बँक तुम्हाला कमीत कमी व्याजही देते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर बहुतांश बँका तुम्हाला 90 टक्क्यांपर्यंतचं कर्ज देण्यासाठी तयार होतात.

मुहूर्त ट्रेडिंग 2022 : ‘या’ शेअर्समध्ये पैसे गुंतवा आणि बंपर रिटर्न्स मिळवा

प्रोसेसिंग फी स्टॅम्प ड्यूटी आणि फोर क्लोजर चार्ज इतर चार्ज यामुळे ग्राहकांवर अधिक भार पडतो. हा चार्ज कोण देणार, याची माहिती तुम्ही तुमच्या फायनान्सरकडून आधीच घ्यायला हवी. आपण कर्ज घेण्यापूर्वी बँक किंवा फायनान्स कंपनीच्या सर्व अतिरिक्त शुल्काबद्दल देखील जाणून घ्यायला हवं. बँका आणि फायनान्स कंपन्या दोन प्रकारची कर्जे देतात, ज्यात व्याजाचे दर वेगवेगळे असतात. यामध्ये ‘फिक्स’ आणि ‘फ्लोटिंग’ इंटरेस्टचा समावेश आहे. फिक्स्ड लोनवर तुम्हाला एकाच वेळी संपूर्ण रकमेवर व्याज आकारले जाते. फ्लोटिंगमध्ये जेवढं कर्ज जितके थकीत आहे तितकेच व्याज आपल्याला आकारले जाते.

मुहूर्त ट्रेडिंग 2022: 1 तासात पैसे Invest करतान करू नका ‘या’ चुका, मिळेल ‘तगडा रिटर्न’

संबंधित बातम्या

कार आणि बाईकचा विमा काढावा. आपल्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे. अशावेळी शोरूममधून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्याकडे तुमच्या गाडीची इन्शुरन्स कॉपी आहे, हे लक्षात घ्यायला हवं. तुम्ही इन्शुरन्स सगळा तपासून घ्यायला हवं.

लोन मूल्य जर तुम्ही एखादी जुनी कार फायनान्सवर खरेदी करत असाल तर तुम्हाला 100% कर्ज क्वचितच मिळतं. ही बँक साधारणत: जुन्या गाडीवर 80% आणि 90०% कर्ज देते. हे अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवरही अवलंबून असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या