JOIN US
मराठी बातम्या / मनी / Dhanteras 2022 : सोन्याच्या खरेदीसाठी जळगावात मोठी झुंबड, सुवर्णनगरी गजबजली

Dhanteras 2022 : सोन्याच्या खरेदीसाठी जळगावात मोठी झुंबड, सुवर्णनगरी गजबजली

धनत्रयोदशी हा एक सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. आज धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोनं खरेदी करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन नांदुरकर,प्रतिनिधि जळगाव : कोरोनामुळे दोन वर्ष एवढी चांगली दिवाळी साजरी करता आली नाही. यंदा दिवाळी सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. धनत्रयोदशी हा एक सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. आज धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोनं खरेदी करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त दिवाळी साजरी होत असल्याने सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा देखील मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सोनं खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? सोनं खरेदी करताना तुम्ही कशासाठी सोनं घेताय हे निश्चित करा. तुम्ही जर 24 कॅरेट घेत असाल तर बिस्कीट किंवा कॉइन घेताना आठवणीने सराफाकडून बिल घ्या. त्याची शुद्धता किती आहे ते तपासून पाहा. तुम्ही जर दागिने घेत असाल तर 22, 18 कॅरेटमध्येमध्ये दागिने घेत असाल तर होलमार्कमधीलच घ्या. बिल घ्यायला विसरू नका. कारण जरी बिल घेतलं नाही तरी GST चे पैसे तुम्ही घेतलेल्या दागिन्यांवर लावले जातात. dhanteras 2022 : धनत्रयोदशीला किती कॅरेटचं सोनं घ्यावं? 24, 22, 18 की 14 यात नेमका काय फरक? दागिने घेताना त्याची शुद्धता आणि होलमार्क तपासणं गरजेचं आहे. 24 कॅरेटमध्ये गुंतवणूक करताना शक्यतो एक एक कॉइन घेणं टाळा कारण प्रत्येक कॉइनमागे मेकिंग चार्ज आकारला जातो ज्याचा भार तुमच्या खिशावर पडतो.

रुपयाचं मूल्य दिवसेंदिवस घसरत आहे यामागे नेमकं काय कारण? तुमच्यावर त्याचा परिणाम कसा होणार तीन गोष्टी लक्षात ठेवा ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. प्रथम- दागिन्यांची किंमत (वजनानुसार), दुसरी- मेकिंग चार्ज आणि तिसरी- जीएसटी (3 टक्के) भरावा लागेल. तुम्ही दागिन्यांसाठी ऑनलाइन पेमेंट करा किंवा ऑफलाइन, तुम्हाला त्यावर फक्त 3% GST भरावा लागेल. तुम्हीही डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचा विचार करताय? किती आहे रिस्क पाहा दागिन्यांच्या मेकिंग चार्जबद्दल वाटाघाटी करणे आवश्यक आहे. बहुतेक ज्वेलर्स वाटाघाटीनंतर मेकिंग चार्जेस कमी करतात. कारण दागिन्यांवर 30 टक्के मेकिंग चार्ज आकारला जातो. मेकिंग चार्जेसचा सर्वाधिक फायदा ज्वेलर्सना होतो.

MCX वर आज सोन्याचे दर 492 रुपयांनी वधारले आहेत. १० ग्रॅमची किंमत 50,635 रुपये आहे. सराफ बाजारातील दर India bullion and jewellers association ltd ठरवतात. त्यामुळे त्यानुसार तुम्हाला बाजारपेठेत दागिने सराफ विकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या