नवी दिल्ली, 20 जून: केंद्र सरकारकडून (Central Government) विविध योजना राबवण्यात येत असतात, ज्यामुळे तुम्ही बचत आणि गुंतवणूक दोन्ही करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामधून तुम्ही काही वर्षात कोट्यवधीचा फंड उभा करू शकता. तुम्ही पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF) मध्ये पैसे गुंतवून करोडपती बनू शकता. पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (Public Provident Fund) लाँग टर्म सेव्हिंग्ससाठी एक चांगला पर्याय मानला जातो. याठिकाणी चांगल्या व्याजाबरोबरच तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतात. पीपीएफ अकाउंटच्या (PPF Account) माध्यमातून तुम्ही करोडपती बनू शकता. जाणून घ्या याकरता तुम्हाला किती रक्कम गुंतवावी लागेल. पीपीएफमध्ये ग्राहकांना मिळतील 5 मोठे फायदे -चांगला व्याजदर -इन्कम टॅक्स सवलतीचा फायदा -सरकारी सुरक्षेची गॅरंटी -कम्पाउंडिंग व्याजाचा फायदा -लाँग टर्ममध्ये गुंतवणूक केल्यास तयार होईल मोठा फंड हे वाचा- खूशखबर! केंद्र सरकार देत आहे 2 लाख रुपयांच बक्षिस, 30 जूनपूर्वी करा हे काम कशाप्रकारे होतं व्याजाचं कॅलक्यूलेशन? पीपीएफमध्ये व्याजाच्या कॅलक्यूलेशनबाबत बोलायचं झालं तर महिन्याच्या पाच तारखेला व्याजाचे पैसे जोडले जातात. तुम्हाला महिन्याचा 5 तारखेला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. शिवाय त्याआधी तुम्हाला हप्ता भरणं देखील गरजेचं आहे. यानंतर तुमच्या खात्यातील त्याच पैशावर व्याज जोडण्यात येईल जी रक्कम 5 तारखेआधी खात्यामध्ये असेल. कशाप्रकारे बनेल 1 कोटी रुपयांचा फंड? PPF ची मॅच्युरिटी 15 वर्षांची असते आणि खात्यामध्ये दरमहा जास्तीत जास्त 12500 रुपये जमा करता येतात. अर्थात वार्षिक 1.5 लाखाची गुंतवणूक करता येईल. मॅच्युरिटीपर्यंत दर महिन्याच्या पाच तारखेआधी तुम्हाला दरमहा 12500 रुपये जमा करायचे आहेत. 7.1 टक्के वार्षिक व्याजाच्या हिशोबाने मॅच्युरिटीवर एकूण व्हॅल्यू 40,68,209 रुपये असेल. पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी पाच-पाच वर्षांनी वाढव्याचा देखील पर्याय आहे. अशावेळी जर 25 वर्षापर्यंत हे योगदान सुरू ठेवले तर तुमच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू 1.03 कोटी होईल. पीपीएफ कॅलल्यूटेर: मॅच्युरिटीसाठी मंथली जमा- 12,500 रुपये व्याजदर- 7.1 टक्के वार्षिक 15 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर रक्कम- 40,68,209 रुपये एकूण गुंतवणूक- 22,50,000 रुपये किती मिळेल व्याज- 18,18,209 रुपये हे वाचा- घरबसल्या सहज करा LPG गॅस बुकिंग, एक मिस्ड कॉल किंवा WhatsApp मेसेजने होईल हे काम 1 कोटी फंडसाठी काय करावं लागेल? जास्तीत जास्त मंथली जमा- 12,500 रुपये व्याजदर- 7.1 टक्के वार्षिक 25 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर रक्कम- 1.03 कोटी रुपये एकूण गुंतवणूक- 37,50,000 रुपये किती मिळेल व्याज- 65,58,015 रुपये