JOIN US
मराठी बातम्या / मनी / Business Ideas : आयटीचा जॉब सोडून दाम्पत्याने निवडला शेती व्यवसाय, आज 'या' शेंगांची पावडर विकून करताय लाखोंची कमाई!

Business Ideas : आयटीचा जॉब सोडून दाम्पत्याने निवडला शेती व्यवसाय, आज 'या' शेंगांची पावडर विकून करताय लाखोंची कमाई!

Business Ideas : इंजिनियर असेलल्या पती पत्नीने नोकरी सोडली अन् गावाकडे येऊन शेती सूरु केली. शेवग्याच्या पान आणि फुलाचे पावडर तयार करुन हे दाम्पत्य लाखो रुपये महिना कमावत आहेत.

जाहिरात

शेवग्याच्या शेगांमधून लाखोंची कमाई करतंय हे दाम्पत्य

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुजीब शेख, नांदेड : सध्याची तरुणाई शेती करण्यापेक्षा नोकरीला जास्त प्रधान्य देते. मात्र असे काही तरुण आहेत जे चांगली नोकरी सोडून स्मार्ट शेती करत आहेत. आज आपण अशाच एका दाम्पत्याविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांनी आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज ते लाखोंची कमाई करत आहेत. नांदेड शहराजवळ असलेल्या वापडेवाडीमधील रहिवासी गुलाब पावडे आणि त्यांच्या पत्नी मंजुषा पावडे हे आयटी क्षेत्रातील इंजिनियर आहेत. मात्र आज ते शेती करत आहेत. गुलाब पावडे यांचे शिक्षण B.E ( COM ) तर मंजुषा यांचे शिक्षण B. E (I T) पर्यंत झाले. लग्नानंतर पावडे दांपत्य पुण्यात नोकरीला गेले. दोघांनी पुण्यात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये दहा वर्ष नोकरी केली. नंतर ते तेलंगणा राज्यातील हैद्राबादमध्ये नोकरीला गेले. तिथे काही वर्ष नोकरी केली. पुणे, हैदराबाद सारख्या मेट्रो शहरात त्यांनी मागील काळात 15 वर्ष मोठ्या कंपनीत नोकरी केली. मंजुषा पावडे यांना महिन्याला 1 लाख 20 हजार तर त्यांचे पति गुलाब पावडे यांना जवळपास दोन लाख रुपये इतका पगार होता. कोरोना काळात work फ्रॉम होम सूरु झालं. तेव्हां ते मूळगावी आले. घरी बसून काम करत दोघं शेती देखील बघायचे. शेतीच्या माध्यमातून वेगळं काही व्यवसाय सुरु करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. यानंतर त्यांनी मग शेतीत काय पिकवावं याचा शोध सुरु केला.

या शेतकऱ्याचा आधुनिक शेतीला फाटा, देशी पद्धतीने कोबी पिकवून करतोय लाखोंची कमाई

 हैदराबादमध्ये राहताना त्यांनी शेवग्याच्या शेतीची माहिती घेण्यास सुरुवात केली. शेवग्याच्या शेंगा आणि पाल्याचे काय गुणधर्म आहेत. लागवड कशी करावी, त्यातून उत्पन्न किती मिळेल याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यानंतर दाम्पत्याने नोकरी सोडून स्वतःच्या दहा एकर शेतीमध्ये कुठलंच पीक न घेता शेतात शेवग्याची लागवड केली. त्यांनी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती करण्यास सुरुवात केली. हे पावडर मोरिंग्या पावडर म्हणून ओळखलं जातं. मधुमेह साठी हे पावडर अत्यंत गुणकारी आणि रामबाण असल्याच म्हणतात. एक हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होतं असून पावडे दाम्पत्याला आज महिन्या काठी दीड लाख रुपये उत्पन्न मिळतेय.

डॉक्टर पिता-पुत्र झाले आधुनिक शेतकरी, लाखोंची आहे कमाई; सरकारनेही केलं तोंडभरून कौतुक

संबंधित बातम्या

 मंजुषा पावडे यांच माहेर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील आहे. त्या देखील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यामुळे शेतीच्या कामाची त्यांना लहानपणा पासुन सवय होती. आता पती सोबत त्या शेतीची कामे करतात आणि शेवग्याच्या पान फुलाचे पावडर त्या स्वतः घरी तयार करतात. शेवग्याच्या शेतात त्यांनी कुठल्याही रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. ते पुर्णपणे नैसर्गिक शेती करतात. शेवग्याच्या पावडरला मुंबई , पुणे , नाशिकसोबतच दक्षिण राज्यात मागणी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांना पावडर विक्री करायची आहे. एक हजार रूपये प्रति किलोने सध्या शेवग्याचे पावडर विकले जातेय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या