विक्रम कुमार झा, प्रतिनिधी पूर्णिया, 14 जून : शेतीत जर थोडासा बदल करून प्रयोग केले तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. असे विविध प्रयोग करुन अनेक शेतकरी आता चांगली कमाई करुन श्रीमंत होत आहेत. त्यातच एक नाव म्हणजे बिहारच्या पूर्णिया येथील शशिभूषण सिंह. प्रायोगिक शेतीसाठी त्यांची ओळख आहे. त्यांनी देशी पद्धतीचा अवलंब करून कोबीच्या लागवडीचा वर्षभर प्रयोग केला. तसेच त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून यातून त्यांना चांगला नफाही मिळत आहे. चालू हंगामात त्यांनी कोबी विकून 50 हजारांचा नफा कमावला आहे. ही पद्धत नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात.
पूर्णियाचे शेतकरी शशिभूषण सिंह सांगतात की, ते त्यांच्या पद्धतीने वर्षभर कोबीची लागवड करून चांगला नफा कमावतात. लोकल 18 शी बोलताना ते म्हणाले की, ते मेढ पद्धतीने शेती करतात. यामध्ये पाण्याचा निचरा होण्याची उत्तम व्यवस्था करून कोबीची लागवड व उत्पादन केले जाते. कोबीचे रोप ते स्वतः तयार करतात. पुन्हा कोबी लावण्यासाठी शेत तयार केले आहे. आता पुन्हा कोबी लावण्यासाठी शेत तयार केले आहे. रोपंही तयार आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर पुन्हा कोबी लावू, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कोणत्याही वस्तूचा जर सीजन असेल तर त्यामध्ये सर्वजण ती खरेदी करून खातात. पण सीजन संपल्यानंतर खाल्ले तर चवीला जास्त चांगली लागते. आता कोबी बाजारात विकली जात नाही. फार कमी शेतकऱ्यांची कोबी बाजारात पोहोचते. लग्नसराई किंवा इतर कार्यक्रमांमध्ये कोबीला खूप मागणी - ते म्हणाले की, लग्नसराई किंवा इतर अनेक कार्यक्रमांमध्ये जेवणात कोबीला खूप मागणी असते. यासाठी खरेदीदारांची गर्दी असते. चालू हंगामात कोबी 55 रुपये किलोने सहज विकला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ते अर्धा एकर कोबीची लागवड करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आत्तापर्यंत मी 50 हजार किमतीची कोबी विकली आहे. कोणत्याही शेतकऱ्याला वर्षभर कोबीची लागवड करायची असेल तर मी त्याला खूप मदत करेन. कोबी लागवडीत धोका आहे. पण हरकत नाही, तुम्ही मला भेटून संपूर्ण माहिती मिळवू शकता. तुम्ही कोबीची शेतीही सहज करू शकता, असेही शेतकरी शशी भूषण सिंह यांनी सांगितले.