JOIN US
मराठी बातम्या / मनी / मुंबई ते गोव्याचा प्रवास पेट्रोलसाठी 3169.4 रुपये तर CNG साठी किती?

मुंबई ते गोव्याचा प्रवास पेट्रोलसाठी 3169.4 रुपये तर CNG साठी किती?

पेट्रोल कार चांगली की सीएनजी कार? या प्रश्नाचे उत्तर येथे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : पेट्रोल आणि डिझेल च्या वाढत्या किमतींमुळे आता देशात सीएनजी कारची मागणी वाढत आहे. 10 लाखांपर्यंतच्या सेगमेंटमध्ये येणाऱ्या बहुतांश कारमध्ये CNG पर्याय उपलब्ध आहेत. आता ग्रँड विटारा आणि टोयोटा हायराइडरसारख्या एसयूव्ही श्रेणीतील काही वाहनांनाही सीएनजी पर्याय मिळू लागला आहे. आजही सीएनजीची किंमत पेट्रोलच्या तुलनेत कमी आहे हे अगदी खरं आहे. पेट्रोलच्या तुलनेत CNG गाड्या जास्त मायलेजही देतात. त्यामुळे सहाजिकच लोक CNG कडे वळत आहेत. मात्र तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकूणच किंमत आणि प्रवास किंवा मायलेजचा विचार न करता सारासार विचार करण्याची गरज आहे. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि CNG कार घ्यायची की पेट्रोल कार घ्यायची या भ्रमात असाल तर आधी दोन्ही कारचे फायदे आणि तोटे जाणून घ्या. आता सीएनजीची किंमत पेट्रोलपेक्षा कमी नाही आणि सीएनजी कारची किंमत पेट्रोल कारपेक्षा 1 ते 1.30 लाख रुपये जास्त आहे. पेट्रोल कार चांगली की सीएनजी कार? या प्रश्नाचे उत्तर येथे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.

Car Insurance घेताय? या 8 टिप्स ठेवा लक्षात, होईल फायदाच फायदा

समजा तुम्ही बलेनो कार घेण्याचा विचार करत असाल तर या कारने आधी तुम्हाला मायलेज आणि प्रवास खर्च कसा येईल ते उदाहरणाद्वारे समजून घेऊया. त्यानंतर दोन्ही कारचे फायदे आणि तोटे समजून घेऊ म्हणजे कोणती कार घ्यायची हे तुम्हाला ठरवता येईल. समजा तुम्ही पेट्रोल कार घेण्याचा विचार करत आहात, तर मुंबईत ते गोवा अंतर 598 किलोमीटर अंतर आहे. साधारण ही गाडी एक लिटर पेट्रोलमध्ये 20 किलोमीटर जाते असा अंदाज धरू. 20 किमी मायलेजला जर 1 लिटर पेट्रोल लागत असेल तर एकूण 598 किलोमीटरसाठी २९.९ लिटर पेट्रोल लागेल. 106 रुपये आजच्या हिशोबाने विचार केला तर 29.9 * 106 म्हणजे तुम्हाला एकूण 3169.4 लीटर पेट्रोल लागेल.

तेच तुम्ही CNG कार घेण्याचा विचार करत आहात, तर मुंबई ते गोवा अंतर 598 किलोमीटर अंतर आहे. साधारण ही गाडी एक किलो CNG मध्ये 30 किलोमीटर जाते असा अंदाज धरू. 20 किमी मायलेजसाठी जर 1 किलो CNG लागत असेल तर एकूण 598 किलोमीटरसाठी २९.९ किलो CNG लागेल. 87 रुपये आजच्या हिशोबाने विचार केला तर 29.9 * 87 म्हणजे तुम्हाला एकूण 1734 रुपयांचा CNG लागले.

Top 5 Best Selling SUVs: फक्त प्रेयसीवरच नाही ‘या’ 5 कारवरही भारतीय फिदा, तुमची फेव्हरेट SUV कोणती?

विचार केला तर तुम्हाला जवळपास 1400 रुपयांचा पेट्रोल आणि CNG मध्ये फरक पडतो. आता एकूण टक्केवारीचा विचार करायचा तर 44 टक्क्यांचा फरक या दोघांमध्ये पडतो. मायलेजच्या दृष्टीने जरी CNG कार परवडणारी असली हे समजून घेऊया की मॉडेल आणि इतर दृष्टीने कोणती बेस्ट. लोक एका वर्षात 12,000 किलोमीटरहून अधिक कार चालवतात, ते लवकरच सीएनजी मॉडेलवर खर्च केलेले अतिरिक्त पैसे वसूल करतील. जर तुम्ही फक्त कौटुंबिक वापरासाठी कार खरेदी करत असाल तर तुम्ही पेट्रोल मॉडेल घ्या. कारण भविष्यातही सीएनजी आणि पेट्रोलच्या दरात फारसा फरक राहणार नाही.

काय सांगता! मिठावर धावणार कार; पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचंही टेन्शन दूर होणार

संबंधित बातम्या

दुसरं महत्त्वाचं म्हणजे CNG गाड्यांचे पार्ट्स महाग असतात. त्याच्या मेंटेन्सवर खूप जास्त खर्च करावा लागतो. तुलनेनं पेट्रोल गाडीच्या मेंटेनन्सला खर्च कमी येतो. सर्व्हिस कॉस्ट देखील CNG गाड्यांना जास्त येते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं देखील आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या