पुण्यात CNG महागला
पुणे : दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बड्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता CNG चे दर वाढले आहेत. त्यामुळे CNG वापरणाऱ्यांना आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. पुण्यात सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालीय. सीएनजीचा दर प्रतिकिलो 1 रूपयांनी वाढला आहे. आता पुण्यात एक किलो सीएनजीसाठी चालकांना 92 रूपये मोजावे लागणार आहेत. पुण्यात एक एप्रिल २०२२ रोजी सीएनजीचा दर ६२.२० रुपये होता. एप्रिल पासून आतापर्यंत सीएनजीच्या दरात 34 रुपयांची वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहन धारक आणि रिक्षा चालकांना फटका बसला आहे.
पेट्रोल-डिझेल GSTच्या कक्षेत येणार? केंद्र सरकार तयार, राज्यांच्या भू्मिकेकडे लक्षसातत्यानं होणाऱ्या या वाढीमुळं पेट्रोल - डिझेलच्या दरात आणि सीएनजीच्या दरात जास्त अंतर राहिलेले नाही. आधीच मुंबई पुण्यात पेट्रोलसाठी106 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे. तर डिझेलही काही दिवसांत शंभरी गाठेल असं एकूण दर पाहता दिसत आहे. वाढत्या महागाईमुळे आता रिक्षा प्रवासही महागण्याची शक्यता आहे. पुण्यात सीएनजी दरवाढ, पाहा कशी होत गेली दरवाढ जानेवारी - 66 रुपये फेब्रुवारी - 68 रुपये मार्च - 73 रुपये एप्रिल - 77.20 रुपये मे - 80 रुपये
पेट्रोल-डिझेल की सीएनजी? तुमचाही होतोय गोंधळ? कोणताही निर्णय घेण्याआधी ह्या फॅक्ट्स वाचाजून - 82 रुपये
जुलै - 85 रुपये ऑगस्ट - 91 रूपये सप्टेंबर - 4 रूपये कपात 87 रूपये ऑक्टोबर - 4 रूपये वाढ - 91 रूपये नोव्हेंबर - 92 रूपये