JOIN US
मराठी बातम्या / मनी / केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 15 लाख रुपये, तुम्हाला देखील करता येईल अर्ज; वाचा सविस्तर

केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 15 लाख रुपये, तुम्हाला देखील करता येईल अर्ज; वाचा सविस्तर

PM Kisan FPO Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 15 लाख रुपये देणार आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 01 जुलै: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेता आता नवीन कृषी विधेयक आणल्यानंतर सरकार शेतीला मोठा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना हे मोठी भेट देणार आहे. नवीन शेतकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपये देणार आहे. सरकारकडून ही प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. याकरता शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल. कसे मिळतील 15 लाख? सरकारने पीएम किसान एफपीओ स्कीम (PM Kisan FPO Yojana) ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत फॉर्मर्स प्रोड्यूसर ऑर्गेनाइझेशनला 15 लाख रुपये दिले जातील. या स्कीमअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक ऑर्गनायझेशन कंपनी बनवावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांना कृषिसंबंधित उपकरणं किंवा फर्टिलायझर्स, वीज किंवा औषधं खरेदी करणं सोपं होईल. हे वाचा- सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ, महिन्याभरात व्हाल मालामाल; वाचा सविस्तर वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय? पंतप्रधान किसान एफपीओ योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या थांबावं लागणार आहे. कारण सरकारने अद्याप या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली नाही. लवकरच यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सरकार लवकरच यासाठी अधिसूचना जारी केली जाईल. हे वाचा- टाटा मोटर्सची महत्त्वाकांक्षी योजना! 2025पर्यंत आणणार 10 नव्या इलेक्ट्रिक कार्स शेतकऱ्यांना मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ मोदी सरकारनं (Modi Government) गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 2019 मध्ये सुरू केलेल्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Scheme) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या